मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने चढ उतार कायम आहे. महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांचं निदान होत आहे. आज (10 जुलै) दिवसभराची कोरोना रुग्णसंख्या समोर आली आहे. चिंताजनक बाब म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या कमी आहे. (in maharashtra today 10 july 2021 8 thousand 296 new corona patient found)
Maharashtra reports 8,296 new cases, 6,026 recoveries, and 179 deaths in the last 24 hours.
Total cases 61,49,264
Total recoveries 59,06,466
Death toll 1,25,528Active cases 1,14,000 pic.twitter.com/Tcac7YUz6A
— ANI (@ANI) July 10, 2021
राज्यात दिवसभरात 8 हजार 296 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर दिवसात एकूण 6 हजार 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत एकूण 59 लाख 6 हजार 466 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तसेच 9 जुलैच्या तुलनेत आजच्या रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात काहीशी घट झाली आहे. आज राज्याचा रिकव्हरी रेट हा एकूण 96.05% इतका झाला आहे. तर हाच रेट 9 जुलैला 96.08% इतका होता.
मृत्यू दरात वाढ
कोरोनामुळे आज 179 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चितांजनक बाब म्हणजे मृत्यू दरात गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. राज्याचा मृत्यू दर 9 जुलैला 2.03 % इतका होता. जो आज 0.1 ने वाढून 2.04 % इतका झाला आहे. दररोज वाढणाऱ्या मृत्यू दरामुळे चिंतेत वाढ झाली आहे. या वाढत्या दरावर नियंत्रण आणण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असणार आहे.
राज्यातील सक्रीय रुग्ण
राज्यात ताज्या आकडेवारीनुसार आजतायागत एकूण 1 लाख 14 हजार सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर कोरोनाचे उपचार केले जात आहेत. या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेत.
#CoronavirusUpdates
१० जुलै, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ५०४
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ७३६
बरे झालेले एकूण रुग्ण - ७०१७१०
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९६%एकूण सक्रिय रुग्ण- ७४८४
दुप्पटीचा दर- ९०९ दिवस
कोविड वाढीचा दर ( ३ जुलै ते ०९ जुलै)- ०.०७ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 10, 2021
मुंबईतील संख्येत वाढ की घट
मुंबईत 24 तासांमध्ये 504 कोरोनाग्रस्ताचं निदान झालंय. तर एकूण 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे मुंबईचा दर हा 96 टक्के इतका आहे. मुंबईत एकूण 7 हजार 484 सक्रीय रुग्ण आहेत. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा आता 909 दिवसांवर पोहचला आहे.