Maharashtra Corona | राज्यात कोरोना मुक्तांपेक्षा कोरोना बाधित अधिक, 24 तासात किती पॉझिटिव्ह?

 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येतील चढ-उतार (Maharashtra Corona Update) कायम आहे.   

Updated: Jul 23, 2021, 08:30 PM IST
Maharashtra Corona | राज्यात कोरोना मुक्तांपेक्षा कोरोना बाधित अधिक, 24 तासात किती पॉझिटिव्ह? title=

मुंबई : राज्यात आज (23 जुलै) कोरोना मुक्तांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण (Maharashtra Corona Update) सापडले आहेत. तसेच दररोजच्या तुलनेत आज कोरोना बाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. महाराष्ट्रात 24 तासांमध्ये एकूण 6 हजार 753 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (in maharashtra today 23 july 2021 6 thousand 753 corona patients registered)

दिवसभरात एकूण 5 हजार 979 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण 60 हजार 22 हजार 485 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यामधील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) हा 96.33 टक्के इतका झालाय. 

तसेच दररोज कोरोना बाधित मृत्यू होण्याच्या दरातही चढ-उतार कायम आहे. आज कोरोनामुळे 167 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा जैसे थेच म्हणजेच 2.09 % इतका आहे.  

सध्या राज्यात 5 लाख 52 हजार 702  व्यक्ती होम क्वारटाईन आहेत. तर 3 हजार 653 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. सध्या राज्यात एकूण 94  हजार 769 सक्रीय रुग्ण आहेत.

मुंबईचा आकडा

मुंबईत गेल्या 24 तासात 374 बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 582 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत मुंबईतील एकूण 70 लाख 91 हजार 98 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97% इतका आहे. तर मुंबईत एकूण 5 हजार 779 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.