मुंबई : राज्याची कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात 3 जुलैच्या तुलनेत काहीसे रुग्ण कमी आढळले आहेत. महाराष्ट्रात आज 9 हजार 336 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 हजार 387 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात आजपर्यंत एकूण 58 लाख 48 हजार 693 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.91 % एवढे झाले आहे. (in Maharashtra today 4 July 2021 9 thousand 336 new corona patients registered)
Maharashtra reports 9,336 new COVID cases, 3,378 patient discharges, and 123 deaths in the past 24 hours
Active cases: 1,23,225
Total discharges: 58,48,693
Death toll: 1,23,030 pic.twitter.com/9HCg2IEqGs— ANI (@ANI) July 4, 2021
राज्यात दिवसात 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यू दर हा 2.01 % इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,25,42,943 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,98,177 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,38,004 व्यक्ती होम क्वारटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 198 व्यक्ती संस्थातमक क्वारंटाईन आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्या
मुंबईची कोरोना आकडेवारीतही गेल्या काही दिवसांपासून घट झालेली आहे, जे मुंबईसाठी दिलासादायक आहे. मुंबईत आज 24 तासात 548 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 705 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्के इतका झालाय. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 767 दिवसांवर पोहचला आहे.
धारावीत शून्य रुग्णाची नोंद
कोरोना काळात मुंबई हॉटस्पॉट ठरलेलं. धारावीत दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. पण आज धारावीतून पुन्हा एकदा मुंबईसाठी दिलासादायक बातमी आली आहे. आज धारावीत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. सध्या धारावीत एकूण 22 सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
Maharashtra: No new case of COVID-19 reported in Mumbai's Dharavi today; active cases in the area stand at 22, says BMC
— ANI (@ANI) July 4, 2021
राज्यात 4 जुलैपर्यंत 3 कोटी 39 लाख 32 हजार 085 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलंय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या :
MIM खासदार इम्जियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण, कोरोनाच्या नियमांची ऐशीतैशी
नागपुरात 17 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडिज, नकळत कोरोना होऊन गेल्याचं उघड