केडीएमसीच्या कोविड सेंटरमधील जेवणात किडे, रुग्णांकडून तक्रार

जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार...

Updated: Jul 6, 2020, 10:36 PM IST
केडीएमसीच्या कोविड सेंटरमधील जेवणात किडे, रुग्णांकडून तक्रार title=
संग्रहित फोटो

आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण : कल्याण भिवंडी बायपासवर असणाऱ्या केडीएमसीच्या टाटा आंमत्रा कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत रुग्णाच्या तक्रारी येत आहेत. एका रुग्णाकडून इथले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या जेवणात किडे असल्याचा दावा महिलेने केला आहे. तसेच याठिकाणी डॉक्टरदेखील येतं नाही, रिपोर्ट मिळत नसल्याची तक्रार या महिलेने केली आहे. 

पॉजिटिव्ह रुग्णाच्या घरच्या रुग्णांना टाटा आंमत्रामध्ये ठेवण्यात येतं आहे. मात्र रूममध्ये सॅनिटाईज केलेले नसते, रूममध्ये अस्वछता असून मोठ्या प्रमाणात धूळ असल्याचे सांगण्यात येतं आहे.

दरम्यान, या महिलेने जेवणाबाबत केलेली तक्रार ही आतापर्यंतची पहिलीच तक्रार असून याची शहानिशा करून त्यावर कार्यवाही करू, तसंच येथे चांगलं जेवण देण्यात येत आहे, मात्र या तक्रारीची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया महापालिका सचिव संजय जाधव यांनी दिली आहे.

धक्कादायक! ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू?

कल्याण डोंबिवलीत क्षेत्रात सोमवारी 413 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा 9499 वर पोहचला आहे. सध्या 5323 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून 4032 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये आत्तापर्यंत 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.