1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून का साजरा होतो? काय आहे या दिवसाचा इतिहास ?

International Labour Day 2023: 1 मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यासोबत आजचा दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला. (Kamgar Din information in Marathi)

नेहा चौधरी | Updated: May 1, 2023, 06:59 PM IST
 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून का साजरा होतो? काय आहे या दिवसाचा इतिहास ? title=
International Workers Day Maharashtra Day Kamgar Din information in Marathi Labour day

International Labour Day History in Marathi: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र (Maharashtra) राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोक हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा मोठ्या उत्साहात साजरा करतात. यादिवशी महाराष्ट्रात कामगार दिनदेखील साजरा केला जातो. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Workers Day) म्हणून का साजरा होतो? काय आहे या दिवसाचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. (Labour day)

कामगार दिनाचा इतिहास (Kamgar Din History)

कामगार दिन हा कामगारांच्या हितासाठी झालेल्या एका चळवळीतून सुरुवात झाला. 19व्या शतकाच्या मध्यावर कामगारांच्या एका चळवळीने (1st may labour day) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या चळवळीतून कामगारांच्या मागण्या पहिल्यांदाच जगासमोर मांडण्यात आल्या. 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी आपल्या मागण्या सांगितल्या. कामगाऱ्यांचे दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत, या मागणीसाठी आंदोलन झाली. (when is labour day celebrated in india)

ऑस्ट्रेलिया पाठोपाठ अमेरिका आणि कॅनडामधील कामगारही या चळवळीत सहभागी झालेत. त्यानंतर हा वणवा पेटला 1986 मध्ये कामगारांच्या  हितासाठी मोर्चे सुरु झालेत. यातील एका मोर्च्यात तर 6 आंदोलकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले. पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने  बाँम्बस्फोट घडवला. त्यात 8 पोलिसांचा मृत्यू आणि 50 पोलीस जखमी झाले होते. या घटनेनंतर आठ आंदोलनकर्त्यांना जबाबदार धरत फाशीची शिक्षा देण्यात आली. (International Workers Day Maharashtra Day Kamgar Din information in Marathi Labour day )

धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या कामगाऱ्यांना शिक्षा देण्यात आली होती, त्यापैकी कोणीही बाँम्बस्फोट घडवून आणला नव्हता. या रक्तरंजित इतिहासानंतर या आंदोलनाला मोठं स्वरुप प्राप्त झालं. 1990 ला कामगारांची ही चळवळ अखेर यशस्वी झाली. त्यांनी 1989 आधी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषद घेण्यात आली. त्या परिषदेमध्ये 1 मे 1890 हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरलं. त्यानंतर 1891 मध्ये 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्याचं मान्यता देण्यात आली.

भारतात लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानकडून (Labor Kisan Party of Hindustan) 1 मे 1923 ला उत्सव चेन्नईत साजरा करण्यात आला. याच कामगार दिनाचं प्रतिक असलेला लाल झेंडाही भारतात तेव्हाच पहिल्यांदा सगळ्यांना दिसला.