अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन माहितीये का? अजित पवारांनी ट्विट करत केलं कौतुक, म्हणतात...

Chandrayaan 3, Sangali Connection: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी अपेक्षा आहे. अशातच चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 

Updated: Jul 15, 2023, 11:40 PM IST
अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन माहितीये का? अजित पवारांनी ट्विट करत केलं कौतुक, म्हणतात... title=
ISRO Chandrayaan 3 Moon Mission Sangali Connection

Chandrayaan 3 Moon Mission Launch: इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेला सुरुवात झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चं यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं. आता चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रतीक्षा आहे.  23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी अपेक्षा आहे. अशातच चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 

काय म्हणाले अजित पवार?

अभिमानास्पद! श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रावरून काल (शुक्रवारी) ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दिशेनं यशस्वीपणे झेपावलं. विशेष म्हणजे या GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक संदीप सोले यांच्या DAZZLE DYNACOATES PRIVATE LIMITED या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे, असं अजित पवार म्हणतात. 

पाहा ट्विट - 

समोर आलेल्या माहितीनुसार, गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम या कंपनीमध्ये देण्यात येत आहेत. जीएसएलव्ही यानाचा एक भाग  सांगलीजवळील माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटसमध्ये तयार करण्यात आला होता. चांद्रयान-३ मध्ये वापरण्यात आलेला भाग सांगलीतील कारखान्यात दीड वर्षापुर्वी तयार करण्यात आला होता, अशी माहिती संचालक संदीप सोले यांनी लोकसत्ताला दिली होती.

आणखी वाचा - Chandrayaan-3 Launch: चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं, मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतूक!

दरम्यान, संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम देखील कंपनीला देण्यात आलं होतं. अंतराळ संशोधनामध्येही खासगीकरण सुरू असल्याने अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. महत्त्वाच्या प्रकल्पाच्या खासगीकरणामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोण घेणार? असा सवाल तज्ज्ञांकडून विचारला जातोय.