close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका आयटी इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

Updated: Apr 12, 2019, 07:49 PM IST
पुण्यात आयटी इंजिनिअरची आत्महत्या

पुणे : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका आयटी इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चेतन जायले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो २६ वर्षांचा होता. चेतन हा हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत कामाला होता. कंपनीतील वरिष्ठ त्याला त्रास देत असल्याने तो मानसिक तनावाखाली होता असे त्याच्या कुटुंबियांचं म्हणणे आहे. त्यातूनच त्याने बुधवारी रात्री तो राहत असेल्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा फोन स्वीकारला जात नसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. 

चेतनने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी मिळाली आहे. त्यात त्याने तो कशामुळे आत्महत्या करत आहे, याची माहिती दिली आहे. तसेच त्याला त्रास देणाऱ्या वरिष्ठांची नावे लिहून ठेवल्याची माहिती चिठ्ठीत, असल्याचे पोलिसांकडून सागण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. चेतनच्या चिठ्ठीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.