भाऊबीजेच्याच दिवशी बहिणीला पाहावं लागलं शहीद भावाचं पार्थिव

हा कसला नियतीचा खेळ...   

Updated: Nov 16, 2020, 08:07 AM IST
भाऊबीजेच्याच दिवशी बहिणीला पाहावं लागलं शहीद भावाचं पार्थिव  title=

कोल्हापूर : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सीमा भागात पाकिस्तान Pakistan कडून करण्यात आलेल्या गोळीबारात शुक्रवारी महाराष्ट्रातील दोन जवान शहीद (jawans martyred) झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथले ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरच्या काटोलमधील भूषण सतई या दोन जवानांना हौतात्म्य आलं. पुढं अंत्यसंस्कारांसाठी या दोन्ही जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.     

सोमवारी म्हणजेच एकिकडे भाऊबीजेचा दिवस सुरु झालेला असतानाच दुसरीकडे मात्र जोंधळे कुटुंबावर भलतीच शोकळा पसरली. बहीण- भावाच्या नात्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा भाऊबीजेच्या याच दिवशी जोंधळे यांच्या बहिणीच्या नशीबी मात्र नियतीनं हा दिवस लिहिला होता. 

दु:ख शब्दांतही मांडता येणार नाही हा तो क्षण, जेव्हा भाऊबीजेसाठी अनेकांनाच भावाचं बहिणीकडे येणं अपेक्षित असतं. जोंधळे यांच्या धाकट्या बहिणीवाही हीच अपेक्षा होती. पण, तिला मात्र या दिवशी शहीद भावाचं पार्थिव पाहावं लागलं.  

कोल्हापूरचे जवान ऋषीकेश जोंधळे आणि काटोलचे रहिवासी. ऋषीकेश जोंधळे हे पूंछ जिल्ह्यातल्या सावजीयानमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या गोळीबारात जोंधळे जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी सैनिकी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असतानाच त्यांना हौतात्म्य आलं. अवघ्या विसाव्या वर्षी या तरूणाने भारत मातेसाठी आपला देह ठेवला. जोंधळे यांच्या मागे त्यांचे आई वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. 

 

१६ डिसेंबर २०१८ मध्ये ऋषीकेश जोंधळे हे मराठा लाईफ इन्फ्रट्रीमध्ये शिपाई म्हणून भरती झाले होते. ते राष्ट्रीय खेळाडू होते. ११ नोव्हेंबरला म्हणजेच ३ दिवसांपूर्वी ऋषीकेश यांनी घरी आई वडिलांशी संपर्क साधला होता. तोच त्यांचा कुटुंबीयांसमवेतचा अखेरचा फोनकॉल ठरला.