मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांनी एमआयएम हा भाजपचा टीम 'बी' असल्याचं म्हटलंय. शिवसेनेच्या या मुद्दयाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुजोरा दिलाय. सपाच्या पराभावला एमआयएम जबाबदार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलंय.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एमआयएम पक्षाने महाविकास आघाडी सोबत येण्याची तयारी दर्शविली आहे, असं सांगितलं. यावरून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे. ते तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये, बंगालमध्ये पाहिले आहे. हा पक्ष आधीच भारतीय जनता पक्ष सोबत काम करत असून ते 'बी टीम'च आहेत, असा आरोप केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात बोलताना सांगितले की, आत्तापर्यंत त्यांचा (MIM) अनुभव आलेला आहे. उत्तर प्रदेश असेल की महाराष्ट्र असेल त्यांचा तसा प्रयत्न देखील सिद्ध झाला आहे. आता औरंगाबाद महापालिकेत नेमका काय त्यांचा रोल आहे हे स्पष्ट होईल. आता हे कळेल की पालिका निवडणुकीत ते नेमकं भाजपला जिंकवणार आहे की हरवणार आहे.