ठाणे जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात CM शिंदे आणि फडणवीस

Jitendra Awhad : ठाण्यातील कळवा पुलाचं आज उदघाटन होणार आहे.यावेळी विकास कामांच्या भूमीपूजनावरुन आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात कळवा पुलाचं उदघाटन होत आहे. 

Updated: Nov 13, 2022, 11:30 AM IST
ठाणे जिल्ह्यात आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार, जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात CM शिंदे आणि फडणवीस title=
संग्रहित छाया

Maharashtra political News : ठाण्यातील कळवा पुलाचं आज उदघाटन होणार आहे. या पुलामुळे कळव्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. मात्र, चर्चा आहे ती कळवा, मुंब्रा आणि डोंबिवलीत विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाची. यावेळी विकास कामांच्या भूमीपूजनावरुन आज पुन्हा एकदा राजकीय फड रंगणार आहे. कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघात (Jitendra Awhad s constituency ) कळवा पुलाचं उदघाटन आज होणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadwanis) यांच्यासह इतर आमदार, खासदार या कार्यक्रमाला असतील. आव्हाड यांना काल मिळालेल्या जामिनानंतर आता आज फडणवीस- शिंदे आणि आव्हाड एकाच मंचावर येत असल्याने या लोकार्पण सोहळ्याला चांगलंच राजकारण रंगण्याची चिन्हं आहेत. 

या पुलासाठी आपणच मंजुरी मिळवली. पाठपुरावा केला त्यामुळे हा पूल नेमका कोणी आणला हे जनतेला माहिती आहे, असे आव्हाड यांनी काल जामीन मिळाल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काय बोलणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान, ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात 'हर हर महादेव' या मराठी सिनेमाचा शो बंद पाडण्याचा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्न केला होता. यादरम्यान चित्रपटगृहात जरासा राडाही झाला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली. न्यायालयाने 14 दिवसांची न्यायलयानीय कोठवडी सुनावली. दरम्यान, त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्राकार परिषदेत कळवा पुलाचे श्रेय आमचेच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.