क्वारंटाईन कोविड रुग्णांना मोफत होम डिलिव्हरी करणारा कल्याणचा तरुण

कोरोना (Coronavirus) काळात माणुसकी हरवत चालल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र याच कोरोना काळात काही जणांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळेल त्या मार्गाने मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले आहे. 

Updated: May 4, 2021, 02:11 PM IST
क्वारंटाईन कोविड रुग्णांना मोफत होम डिलिव्हरी करणारा कल्याणचा तरुण
प्रतिकात्मक छाया

आतिश भोईर / कल्याण : कोरोना (Coronavirus) काळात माणुसकी हरवत चालल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र याच कोरोना काळात काही जणांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळेल त्या मार्गाने मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले आहे. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णाला घरीच क्वारंटाईन करण्यात येत आहे. नातेवाईक किंवा मित्र मंडळी आसपास असले तर ठीकच आहे नाही तर गरजेच्या वस्तू घरपर्यत पोहोचवण्यास कुणी नसल्यास होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होतात. अशा रुग्णांना घरापर्यंत सेवा पुरवण्यासाठी कल्याणतील एका तरुणाने पुढाकार घेतला आहे. ( free home delivery to quarantine covid patients)

कल्याणचा विकी मोरे हा तरुण अशा रुग्णांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू, औषधे,जेवणाचे डब्बे, घरपोच पुरविण्याची सुविधा देत आाहे. या होम डिलिव्हरी सेवेसाठी विकी कोणतेही शुल्क आकारता नाही. विकी हा कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहतो. तो एका विमा कंपनीत कामाला आहे. त्याच्या घरी आई आणि बाबा आहेत. घरी राहून उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी त्यांची काळजी घेण्यास कोणी नसते. त्यात वयोवृद्ध रुग्णांना जास्त त्रस सहन करावा लागतो. कोरोनाची लागण झाल्याने त्याना घराबाहेर पडता येत नाही. काहींच्या घरी लहान मुले असतात. त्यांना घराबाहेर जाऊन काही खरेदी करुन आणण्याची समज नसते. ही बिकट परिस्थिती पाहता विकीने सोशल मिडियावर त्याचा मोबाईल नंबर शेअर केला. त्याने त्याद्वारे आवाहन केले. 

 ज्या रुग्णाला जेवण, घरातील अन्नधान्य, औषधे हवी असतील त्यांनी त्याला कॉल केल्यास तो केवळ जीवनाश्यक वस्तू मोफत घरपोच सेवा देत आहे. विकीचा सोशल मीडियावरील मोफत सेवेचा मेसेज पाहून अनेकांनी मदतीसाठी कॉल केला. त्याला कॉल येणे सुरु झाले. विकीकडे स्वत:ची दुचाकी आहे. या दुचाकीद्वारे तो ही सेवा देत आहे. गेल्या आठवडाभरात त्याने 100  पेक्षा जास्त रुग्णांना मोफत घरपोच सेवा दिली आहे. विकीच्या या सेवेमुळे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळला आहे.