कल्याण : Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही राजकीय नेते आणि मंत्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (KDMC Commissioner Dr. Vijay Suryavanshi) याना कोरोनाची लागण झाली आहे. तो होम क्वारंटाईन झाले आहेत.
केडीएमसी (Kalyan - Dombivali Municipal Corporation) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आयुक्त सूर्यवंशी यांनी बूस्टर डोस घेतला होता. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पालिका कर्मचाऱ्याना कोरोनाची लागण झाली आहे. महानगरपालिकेच्या 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
कल्याण डोंबिवलीत महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. आतापर्यंत तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 24 तासात कोरोना रुग्णांची संख्या 1646 पोहोचली आहे. दिवसभरात 208 रुग्णांना डीचार्ज देण्यात आला आहे. आता उपचार घेत असलेले 10020 रुग्ण आहेत.