वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनपा आयुक्तांची मार्केटमध्ये अचानक धडक

 कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क 

Updated: Feb 19, 2021, 06:26 PM IST
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मनपा आयुक्तांची मार्केटमध्ये अचानक धडक title=

आतिष भोईर, कल्याण: गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याआधी हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क आहे. नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यातच आज सकाळी KDMC चे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजी मार्केट तसेच दुकानांमध्ये अचानक धडक दिली. नियम न पाळणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता पुन्हा रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या 2 दिवसांपासून रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे पालिकेच्या चिंता ही वाढल्या आहेत. कोविड नियम पाळण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. पण तरी लोकं बेजबाबदारपणे वागत आहेत.

लग्नाचे हॉल आणि समारंभांवर महापालिका प्रशासनाची करडी नजर आहे. नियम जर पाळला नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत. अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी झी मीडियाशी बोलताना दिली.

बातमीचा व्हिडिओ