कोल्हापुरात गोळीबार, गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी

 कुख्यात गुंड विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला.  

Updated: Dec 6, 2018, 07:16 PM IST
कोल्हापुरात गोळीबार, गुंड काळबा गायकवाड गंभीर जखमी

कोल्हापूर : कुख्यात गुंड विजय ऊर्फ काळबा गायकवाड हा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत गंभीर जखमी झाला. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला काळबा सासऱ्याच्या वर्षे श्राद्धसाठी तो कोल्हापूरच्या रूईकर कॉलनीत आला होता. यासंदर्भात गुन्हे शाखेला माहिती मिळाली. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धाड टाकली.

त्यावेळी पोलीस आणि त्याच्यात झडापट झाली. गायकवाडने पोलिसांच्यावर बंदूक रोखली. त्यामुळे ही झटापट झाली. यावळी दोन राऊंड फायर झाले. यात कुख्यात गुंड काळबा तसेच मोहिते नावाचे पोलीस कर्मचारी हे दोघे जखमी झाले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनीच काळबावर गोळीबार केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय.