PUBG च्या व्यसनामुळे कोल्हापुरातील तरुणाची विचित्र अवस्था

पबजी गेमचं व्यसन ठरतंय धोकादायक... 

Updated: Sep 15, 2019, 05:11 PM IST
PUBG च्या व्यसनामुळे कोल्हापुरातील तरुणाची विचित्र अवस्था

कोल्हापूर : पब्जी खेळाचं व्यसन अवघ्या तरुणाईला लागलं आहे. पब्जी खेळामध्ये तरुण - तरुणी इतके गर्क होऊन जातात, की त्यामुळे त्यांना बाहेरच्या वास्तव जगाचंही भान राहत नाही. मात्र हा पब्जी खेळ घातक रुप घेत आहे. या पब्जी खेळामुळेच कोल्हापुरातल्या एका तरुणाची विचित्र अवस्था झाली आहे. हा तरुण कायम पब्जी खेळत असायचा. त्यामुळे त्याची ही अशी विचित्र अवस्था झाली आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात आल्यानंतरही तो पब्जी खेळातलीच बडबड करत होता. त्याला आवरणं जिकीरीचं होऊन बसलं होतं.

पबजी या गेममुळे याआधी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतातील तरुणांमध्ये याचं वेड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. तासनतास मुले पबजी खेळताना दिसत आहे. पबजीच्य़ा व्यसनामुळे मुलांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. 

.