close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'कोल्हापूर, सांगली महापूर हा प्रशासकीय गलथनामुळे'

कोल्हापूरला ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरसंदर्भातील जनहीत याचिका आज उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत निकालात काढली.

Updated: Sep 11, 2019, 09:00 PM IST
'कोल्हापूर, सांगली महापूर हा प्रशासकीय गलथनामुळे'

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : कोल्हापूरला ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरसंदर्भातील जनहीत याचिका आज उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत निकालात काढली. कोल्हापूर आणि सांगलीत आलेला महापूर मानवनिर्मित असून, प्रशासकीय गलथानपणामुळे झाला तसंच धरणातील पाणीसाठा संबंधी केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकर उल्लंघन महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याने केल्याने झाला. असा आरोप करणारी याचिका आज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती या याचिकेत अशाप्रकारची पूरपरिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी नियमांचे पालन व्हावे आणि वाढीव अनुदान मिळावे अशी मागणी होती. तसेच पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी तज्ञांची समिती नेमून त्याच्याकडून शिफारसी मागवाव्यात अशी मागणी ही या यचिकेचे केली होती.

आज याचिका उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजोग व न्या. श्रीमती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणीला अली. पहिल्या सुनवणीतच याचिका निकालात काढली. नुकसानभरपाई आणि कारवाई या संदर्भातील सगळे अधिकार राज्य आणि केंद्राकडे आहेत. त्यात कोर्टाने हस्तक्षेप करण्यास मनाई केली आहे. याचिकेतील सुचनांवर उचित कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रीय जनआंदोलनाच्या समन्वयाचे सदस्य व कुरुंदवाड येथील रावसाहेब आलासे तसेच पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या वतीने अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.