वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत

नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलीय.

Updated: Sep 3, 2017, 05:39 PM IST
वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत title=

नाशिक : नाशिकमधील वणीच्या सप्तश्रृंगी गडावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलीय. दरड कोसळल्यानं गडावर जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. गणपती पॉईंटजवळ एका भाविकाच्या गाडीवर ही दरड कोसळली. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कुणाला इजाही झाली नाही.

दरड कोसळयाची माहिती मिळताच पीडब्ल्यूडीच्या कर्मचा-यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि दरड हटवण्याचं काम सुरु केलं. या कामात ग्रामस्थ आणि मंदिराच्या ट्रस्टच्या कर्मचा-यांनीही मदत केल्यानं अवघ्या काही तासांतच दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं आणि वाहतूकीसाठी रस्ता मोकळा झाला.