धबधब्यावरच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा मृत्यू

धबधब्यात पडून एका अतिउस्ताही तरुणाचा मृत्यू झाला.

Updated: Sep 3, 2017, 05:31 PM IST
धबधब्यावरच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा मृत्यू

नांदेड : धबधब्यात पडून एका अतिउस्ताही तरुणाचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्द सहस्त्रकुंड धबधबा येथे शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. मराठवाडा आणि विदर्भाला विभागणाऱ्या पैनगंगा नादिवर हा धबधबा आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येतात.

असाच एक तरुण इथं आला होता. मात्र, अतिउत्साही तरुण धबधब्याच्या वरच्या दिशेच्या पाण्याच्या प्रवाहात उतरला. तेव्हा तोल जाऊन तो पाण्याचा प्रवाहात ४० फूटांवरून तो खाली पडला. या ठिकाणी संपूर्ण पाषाण आहे, त्यावर तो आपटला. पुढे पाण्याच्या डोहात बुडाल्याने हा तरुण सापडू शकला नाही. अखेर त्याचा मृतदेह सापडला.

या तरुणाची अद्याप ओळख पटली नाही. तिथे असलेल्या एका फोटोग्राफरनं ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या आधीही या ठिकाणी अशा घटना घडल्यात. मात्र, मागणी करुनही अजूनही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला नाही.