...आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, लातूर बोर्डाचा निर्णय

लातूर शिक्षण मंडळाचा ऐतिहासिक निर्णय...

Updated: Feb 4, 2020, 07:07 PM IST
...आता प्रॅक्टिकल परीक्षेलाही भरारी पथक, लातूर बोर्डाचा निर्णय title=
संग्रहित फोटो

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राज्यात पहिल्यांदाच लातूर शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक अर्थात प्रॅक्टिकल परीक्षेलाही आता भरारी पथक नेमली आहेत. लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ही भरारी पथके फिरणार आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी लातूरच्या शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. तसेच याची राज्यभर अंमलबजावणी केल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार होतील असा दावा लातूर बोर्डाने केलाय. मात्र या निर्णयाला काही शिक्षक संघटनांनी  विरोध केल्यामुळे शिक्षण मंडळाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा बसावा म्हणून राज्य शिक्षण मंडळ हे भरारी पथक नेमत असतं. केवळ लेखी परिक्षेलाच ही भरारी पथकं आतापर्यंत कार्यरत राहत होती. मात्र यावर्षी पासून लातूरच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळं विविध परीक्षा केंद्रावर भेटी देणार आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी लातूरच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परिक्षेलाही भरारी पथक नेमण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

अनेक शाळेत प्रात्यक्षिक परिक्षा न होता विद्यार्थ्यांचा चेहरा पाहून विद्यार्थ्यांना गुण दिले जात होते. दहावीच्या प्रत्येक विषयासाठी २० गुण तर बारावीसाठी ३० गुण विद्यार्थाना बहाल केले जातात. मुळात शाळात प्रात्यक्षिक घेण्यासाठी विज्ञान साहित्यच उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा कागदोपत्रीच होत असल्याचे निदर्शनास आलं आहे. अशा तक्रारी लातूर बोर्डाला प्राप्त झाल्या. त्यामुळेच लातूर बोर्डाअंतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरु केल्याचे लातूर बोर्डाचे प्रभारी सचिव औदुंबर उकिरडे यांनी स्पष्ट केलंय. अशा पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षांना भरारी पथक नेमण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. त्यामुळेच लातूरच्या शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परिक्षेला भरारी पथके नेमली असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

लातूर बोर्डाचे अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली हे भरारी पथक कार्यरत असणार असून ज्याठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गडबड असेल त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशाराही बोर्डाच्या प्रभारी सचिवांनी दिला आहे. मात्र या निर्णयाला आता विरोध ही होऊ लागला आहे. काही शिक्षक संघटनांनी याला विरोध केला असून या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्य शासन एकीकडे टक्केवारी वाढविण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेत असताना लातूरच्या शिक्षण मंडळाच्या भूमिकेत विरोधाभास कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

एकूणच दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परिक्षेतील होणारे घोळ, शिक्षक आणि विविध शाळांमध्ये उपलब्ध नसणाऱ्या विज्ञान साहित्याचा मुद्दा यामुळे अधोरेखित झाला आहे. त्यामुळे गुणवत्तापुर्ण विद्यार्थीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंडळ विरुद्ध शिक्षक संघटना आमने सामने उभे टाकल्या आहेत. मुळात गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवायचे असतील तर लातूरच्या शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून राज्य सरकार त्यांची राज्यभर अंमलबजावणी करणार का हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. 

  

आताच्या हेडलाईन्स

'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे

हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...

World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान

'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण

दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल

वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर

'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'

वसीम जाफरचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय

सेलिब्रिटींची मजेशीर टोपण नावं माहितीयेत का?