परतीच्या पावसाचा लातूरला दिलासा; १५ ऐवजी १० दिवसआड पाणीपुरवठा

लातूर शहरातील नागरिकांना दिलासा

Updated: Nov 2, 2019, 08:37 PM IST
परतीच्या पावसाचा लातूरला दिलासा; १५ ऐवजी १० दिवसआड पाणीपुरवठा title=
संग्रहित फोटो

लातूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं असलं तरी याच परतीच्या पावसाने लातूर शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. परतीच्या पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शहराला आता १५ दिवसांऐवजी १० दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी याबाबत लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचं सांगितलं आहे.  मांजरा धरणातील पाणीसाठा वाढला असून तावरजा प्रकल्पासह आणि निम्न तेरणा प्रकल्पही ५० टक्केपेक्षा अधिक भरला आहे. 

हे पाणी आता पुढील वर्षभर म्हणजेच जुलै पर्यंत पुरणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. परंतु पाणी जपून वापरण्याचा सल्लाही लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलाय.

  

लातूरला पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण कोरडे पडल्याने लातूरला रेल्वने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरु असते. धरणात पाणीसाठाच नसल्याने लातूरकरांना १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत होता. मात्र आता परतीचा पाऊस लातूरकरांच्या पथ्यावर पडल्याने, काही प्रमाणात का होईना पण लातूरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.