सांगली : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज सांगलीमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लिंगायत बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांनी केले. देशभरातील विविध पीठांचे जगद्गुरू यावेळी उपस्थित होते. नांदेड, लातूर, बेळगाव, हुबळीनंतर लिंगायत समाजाचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला मोर्चा आज सांगलीमध्ये काढण्यात आला होता.