Gudi Padwa Celebration LIVE : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार?

Gudi Padwa Celebration LIVE :  आज चैत्र प्रतिपदा...मराठी नूतन वर्ष...आज घरोघरी विजयाचं प्रतिक गुढी उभारण्यात आली आहे. मुंबई, पुणे आणि नागपुरात गुढी पाडव्यानिमित्त भव्य शोभा यात्रा निघाल्या आहेत. 

Gudi Padwa Celebration LIVE : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा! राज ठाकरे काय बोलणार?

Gudi Padwa Celebration LIVE : गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि गिरगावात शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येतंय.. पारंपरिक वेशभूषेत तरुणाईसह लहानथोर उत्साहाने या शोभायात्रांमध्ये सहभागी होत आहेत... या शोभायात्रांच्या माध्यमातून केवळ तरुणाई नटून थटून बाहेर पडते असं नाही तर यातून विविध सामाजिक संदेशही दिले जात आहेत.. 

9 Apr 2024, 18:27 वाजता

'राज ठाकरे वाघ माणूस, दिल्लीपुढे झुकणार नाहीत',विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

 

Vijay Wadettivar on Raj Thackeray : राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत.. मात्र त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांकडून होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलीय.. राज ठाकरेंना पिंज-यात अडकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले.. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होतोय. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीला साथ देणार का.. राज ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याआधीच विजय वडेट्टीवारांनी टीका केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 Apr 2024, 13:18 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या दादरमधील शिवतीर्थावर गुढी उभारली. यावेळी सहकुटुंबानं मिळून गुढीचं पूजन करून मराठी नववर्षाचं स्वागत केलं. दरम्यान मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणारेय. मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलीय.. स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात खुर्च्याही शिवाजी पार्कात मांडण्यात आल्यात. या मेळाव्यातून राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय.  

9 Apr 2024, 11:23 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर नवचैतन्याची गुढी उभारण्यात आली. हजारो वर्षांपासून तुळजाभवानीच्या मंदिरात ही परंपरा चालत आलीये. मंदिरातील गुढी उभारल्यानंतरच तुळजापूरमध्ये सर्व गुढ्या उभारल्या जातात.

9 Apr 2024, 11:23 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  परभणी जिल्ह्यातही नवं वर्ष स्वागताचा उत्साह पाहायला मिळतोय. पूर्णा तालुक्यातील लिमला, जिंतूर तालुक्यातील पाचेगाव आणि सोनपेठ तालुक्यातील नरवाडी गावात तांब्याच्या गुढी ऐवजी भगवी पताका लावून गुढी पाडवा सण साजरा करण्यात आलेला दिसतोय. सरळ ताब्यांत नारळ ठेऊन भगव्या पताक्याची गुढी उभारून पाडवा सण साजरा केला जातोय...

9 Apr 2024, 11:18 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  गुढी पाडव्यानिमित्त माणगाव शहरात नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली. सद्गुरू नरेंद्र महाराज संप्रदायाने या यात्रेचं आयोजन केलं होतं. ढोल ताशा आणि खालुबाजाच्या गजरात पारंपरिक लेझिम खेळत हातात भगवे झेंडे घेत तरुण-तरुणी यात सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर मंगल कलश घेतला होता. विविध चित्ररथांवर छत्रपती शिवाजी महाराज, राम लक्ष्मण, वासुदेव अशा वेशभूषा करणा-यांनी लक्ष वेधून घेतलं.

9 Apr 2024, 11:17 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  चंद्रपुरातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने चंद्रपूर- गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेने गुढी उभारली. . जुना वरोरा नाका चौकात गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं. आरती -पूजन करत मिठाई वाटप करून उत्साहात मराठी नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यासोहळ्यात  ब्राह्मण सभेचे पदाधिकारी आणि समाज सदस्य सहभागी झाले 

9 Apr 2024, 11:16 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  गुढी पाडव्यानिमित्त  कार्ला गडावर गुढी उभारण्यात आली. गुढीची विधीवत पूजा एकविरा देवस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात आली. यानंतर गुढी उभारून आजपासून कार्ला एकविरा देवीच्या चैत्र  उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

9 Apr 2024, 11:16 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर नव वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय.गुढीपाडव्यानिमित्त पहाटे देवीची महाआरती आणि अभिषेक करण्यात आला. आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली.  मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने देवीचं रूप खुलून दिसतंय.

9 Apr 2024, 11:15 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  पुण्यात गुढीपाडव्यानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होतेय. मंदिराच्या दर्शनी भागावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. उत्साह आणि भक्तिमय वातावरणात मराठी नव वर्ष पुण्यात साजरा होतंय

9 Apr 2024, 11:14 वाजता

Gudi Padwa Celebration LIVE :  साईनगरी शिर्डीतही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय. साई मंदिराच्या कळसावर पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलीये. तर साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांच्या आभुषणांसह साखरेच्या गाठीची माळा परिधान करण्यात आलीय.