Loksabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्यात 53.18% मतदान, तर देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 62.80 टक्के मतदान

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. मराठवाडा, पुणे, शिरूर, नगर, बीडमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावरणार असून राज्यातील 11 जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. 

Loksabha Election 2024 Live Updates :  राज्यात चौथ्या टप्प्यात 53.18% मतदान, तर देशात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 62.80 टक्के मतदान

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील पुण्यासह मावळ आणि शिरूर मध्ये आज प्रचाराची सांगता होणार असून 13 तारखेला मतदान होणार आहे. पुणे, मावळ, शिरूर मधील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सभा, गाठीभेटी आणि रोड शोचा धुरळा आहे. मावळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडशो
तर पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पुण्यात तळ ठोकून बसले आहेत.
शिरूरमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. 

 

11 May 2024, 09:21 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  'माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण...' राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेतली. पुणे मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार सभेत त्यांनी शरद पवारांवर निशाणा तर अजित पवारांचं कौतुक केलं. 

सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा - माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे

 

11 May 2024, 09:12 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मावळमध्ये यंत्रणा सज्ज 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मावळमध्ये यंत्रणा सज्ज झालीये.. सोमवारी मावळ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय. यासाठी लोणावळ्यात ग्रामीण पोलिसांनी रुटमार्च काढला..

 

11 May 2024, 08:17 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  बातमी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याची...

आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले.. आता आम्हालाच मोदी डोळा मारतात.. आ जा मेरे गाडी में बैठ जा म्हणतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवली. मोदी आता परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र त्यांना दिल्ली बघू देणार नाही, असंही ठाकरेंनी संभाजीनगरातल्या जाहीर सभेत बोलताना ठणकावलं.

11 May 2024, 07:57 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : 13 मे रोजी राज्यातील 298 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत होणार बंद 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 10 राज्यातील 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासाठी महाराष्ट्रातील 298 उमेदवारांचं भवितव्य 13 मे रोजी मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात नंदूरबार, जळगाव,  रावेर,  जालना,  औरंगाबाद (संभाजीनगर),  मावळ,  पुणे,  शिरुर,  अहमदनगर,  शिर्डी, बीड या मतदारसंघात मतदान होणार आहे. 

 

11 May 2024, 07:50 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :  प्रचारसभा संपल्यानंतर नेतेमंडळी काय करतात?

सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यात सगळेच नेते एकमेकांवर सडकून टीका करताहेत.  एकमेकांचा उद्धार करणारे नेते प्रचार सभा संपल्यानंतर काय करत असतील, याची उत्सुकता बहुतेकांना असते. संभाजीनगरच्या हॉटेल रामामध्ये त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं. एकमेकांवर विखारी टीका करणारे शिंदे पक्षाचे संजय शिरसाट आणि ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले. शिंदे पक्षाचे मंत्री उदय सामंत आणि भाजपच्या नेत्यांसोबत त्यांच्या निवांत गप्पा सुरु होत्या. संभाजीनगरच्या हॉटेल रामामध्ये हे सर्व मुक्कामाला आले. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे परस्परांशी आपुलकीचे संबंध असताना, त्यांचे समर्थक मात्र आपल्या नेत्यांवरुन आपल्याच लोकांचे इतके टोकाचे विरोधक का होतात हे मात्र कोडंच आहे

11 May 2024, 07:46 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरे आज पालघरमध्ये, निवडणुकीची रणनिती ठरण्यासाठी बैठक

उद्धव ठाकरे आज पालघर दौ-यावर आहेत...पालघरमधील विविध शिष्टमंडळं, मुस्लीम संघटना, तसंच बंदरविरोधी संघटनांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत... पालघरमधील जलदेवी रिसॉर्ट इथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या बैठका होतील... तर 14 मे रोजी उद्धव ठाकरेंची पालघरमध्ये जाहीर सभा होणारे... त्यापूर्वी ठाकरेंची ही बैठक होतेय...