Breaking News LIVE Updates: रात्री उशीरा अचानक फडणवीस शिंदेंच्या घरी पोहचले अन्...

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून  दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...

Breaking News LIVE Updates: रात्री उशीरा अचानक फडणवीस शिंदेंच्या घरी पोहचले अन्...

22 Oct 2024, 08:47 वाजता

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का आहे. हदगाव तालुक्यातील सावरगाव हद्दीत भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. 3.8 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता आहे. सकाळी 6.52 वाजता भूकंपाचा हा सौम्य धक्का जाणवला. भारतीय भूकंप मापक यंत्रणेवर नोंद करण्यात आल्याचं जिल्हा आपत्ती केंद्राने सांगितलं आहे.

22 Oct 2024, 08:35 वाजता

रात्री उशीरा अचानक फडणवीस शिंदेंच्या घरी पोहचले अन्...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर आले होते. त्यांच्यासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे याच्यात महत्वाची बैठक पार पडली. तिघांमध्ये मुंबईसह राज्यातील जागा वाटपासंदर्भात बंद दाराआड बैठक झाली. जवळपास 2 तास ही बैठक झाली.

22 Oct 2024, 07:36 वाजता

बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंना शरद पवारांचा मोठा धक्का

भाजपला रामराम ठोकत राजेंद्र मस्के राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. मस्के बंडखोरीच्या तयारीत असल्याची बातमी 'झी 24 तास'ने दिली होती. मस्के यांचा हा निर्णय पंकजा मुंडेंना निवडणुकीअगोदर मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक शरद पवारांच्या गळाला लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी मस्के यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मोठे शक्ती प्रदर्शन करत मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

22 Oct 2024, 07:28 वाजता

दिवाळीसाठी एसटीच्या जादा फेऱ्या 

परिवहन पालघर विभागातील आठ आगारांतून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर विभागाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी तिकीट दरांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुट्टीत आपल्या गावी घरी जाण्याकरिता व सुट्टीतून पुन्हा येण्यासाठी 50 टक्के सवलतीचे अर्ज वितरित करण्यात येतील. गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

22 Oct 2024, 06:40 वाजता

शेकाप आज उमेदवारांची यादी जाहीर करणार

शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. जयंत पाटील अलिबागमधून उमेदवारांच्या यादीची घोषणा करणार आहेत. शेकप 8 ठिकाणी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. महविकास आघाडी शेकप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

22 Oct 2024, 06:38 वाजता

प्रियांका गांधी उद्या उमेदवारी अर्ज भरणार

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वद्रा वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली. प्रियांका अर्ज भरत असताना काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहणार आहेत.

22 Oct 2024, 06:37 वाजता

मनसेची दुसरी यादी जाहीर होणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज दुसरी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल कल्याणमध्ये राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

22 Oct 2024, 06:35 वाजता

कुलाब्याच्या माजी आमदाराला फडणवीस आज भेटणार

भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित हे सोमवारी 'सागर' बंगल्यावर दाखल झाले होते. परंतु फडवणीस यांनी आज सकाळी 11 वाजता भेटण्यासाठी वेळ दिली आहे.

22 Oct 2024, 06:33 वाजता

संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम; तुतारी हाती घेणार?

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बैठक घेऊन संदीप नाईक आज निर्णय जाहीर करणार आहेत. संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

22 Oct 2024, 06:31 वाजता

कोकणात अजित पवारांना ठाकरेंचा मोठा धक्का

कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता 'मातोश्री' निवासस्थानी पक्षात प्रवेश करणार आहेत. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी यावेळी 'मातोश्री'वर उपस्थित असणार आहेत.