IND VS NZ 2nd and 3rd Test Team India Squad : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून बंगळुरू येथे पार पडलेला सामना हा न्यूझीलंडने 8 विकेट्सने जिंकला. यासह न्यूझीलंडने तब्बल 36 वर्षांनी भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकला. आता न्यूझीलंडने सीरिजमध्ये 0-1 ने आघाडी घेतली असून दुसरा आणि तिसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने रविवारी रात्री भारताचा संघ जाहीर केला. यात 25 वर्षीय ऑल राउंडर खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे.
भारत - न्यूझीलंड दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियात समावेश केलेल्या खेळाडूचं नाव वॉशिंग्टन सुंदर असून तो एक ऑल राउंडर खेळाडू आहे. उत्कृष्ट फलंदाजी सोबतच तो स्पिन गोलंदाजी सुद्धा करतो. वॉशिंग्टन सुंदरने शेवटचा टेस्ट सामना खेळून 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याने शेवटचा टेस्ट सामना हा 4 मार्च 2021 रोजी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. ब-याच कालावधीनंतर सुंदरचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.
वॉशिंग्टन सुंदरचा जन्म 5 ऑक्टोबर 1999 रोजी चेन्नईत झाला असून जानेवारी 2021 मध्ये त्याने भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी त्याने फक्त 4 टेस्ट सामने खेळले ज्यात 6 इनिंगमध्ये त्याने 3 हाफ सेंच्युरी केल्या. सुंदरीच्या फलंदाजीची सरासरी ही 66 धावांहून अधिकची आहे. तसेच टेस्टच्या 6 इनिंगमध्ये सुंदरीने त्याच्या गोलंदाजीने भारताला 6 विकेट्स मिळून दिले होते. आता पुन्हा एकदा भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळाल्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत तो भारतासाठी एक चांगला पर्याय राहील.
हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?
News
Squad Update: Washington Sundar added to squad for the second and third TestINDvNZ | IDFCFIRSTBank
Details
— BCCI (BCCI) October 20, 2024
न्यूझीलंड विरुद्ध पुण्यात आणि मुंबईत होणाऱ्या टेस्ट सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून यात वॉशिंग्टन सुंदर सह शुभमन गिलचे देखील पुनरागमन झाले आहे. बंगळुरू टेस्टमध्ये शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती, मात्र याचा फटका फलंदाजीत टीम इंडियाला जाणवला.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.