Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...

Maharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असून  दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर...

Breaking News LIVE Updates: महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला! भाजपाला 150 ते 160 जागा तर शिंदे-अजित पवारांना...

22 Oct 2024, 06:37 वाजता

मनसेची दुसरी यादी जाहीर होणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज दुसरी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल कल्याणमध्ये राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर केली. राजू पाटील यांना कल्याण ग्रामीण आणि अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

22 Oct 2024, 06:35 वाजता

कुलाब्याच्या माजी आमदाराला फडणवीस आज भेटणार

भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित हे सोमवारी 'सागर' बंगल्यावर दाखल झाले होते. परंतु फडवणीस यांनी आज सकाळी 11 वाजता भेटण्यासाठी वेळ दिली आहे.

22 Oct 2024, 06:33 वाजता

संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम; तुतारी हाती घेणार?

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बैठक घेऊन संदीप नाईक आज निर्णय जाहीर करणार आहेत. संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

22 Oct 2024, 06:31 वाजता

कोकणात अजित पवारांना ठाकरेंचा मोठा धक्का

कोकणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव हे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता 'मातोश्री' निवासस्थानी पक्षात प्रवेश करणार आहेत. स्थानिक आमदार राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी यावेळी 'मातोश्री'वर उपस्थित असणार आहेत.

22 Oct 2024, 06:29 वाजता

महाविकास आघाडीची आज दुपारी निर्णायक बैठक

आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटला बैठक होणार आहे. जागावाटपामध्ये ज्या जागांमुळे तिढा निर्माण झाला आहे त्यावर तोडगा काढण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न असेल.

22 Oct 2024, 06:26 वाजता

धुळ्यात शिंदे गटाला धक्का! जिल्हा प्रमुखच जरांगेंकडून लढणार?

धुळ्यात शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी मनोज जरागेंची भेट घेतली.
मोरे यांनी जरांगे यांच्याकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. धुळे शहर विधानसभेची जागा भाजपाला सोडल्याने मानोज मोरे नाराज आहेत.

22 Oct 2024, 06:24 वाजता

उकाडा, घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण

संध्याकाळी पडणारा पाऊस आणि दिवसभर ऊन यामुळे जाणवणाऱ्या उकाड्याने मुंबईकर बेजार झाले आहेत. सांताक्रुझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर सोमवारी सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवेत वाढलेला उष्मा आणि आर्द्रता यामुळे उकाडा अधिक तापदायक ठरत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पारा असाच चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

22 Oct 2024, 06:23 वाजता

पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा कहर! सावधनतेचा इशारा

शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू आणि चिकुनगुन्याचा उद्रेक झाला आहे. शहरात महिनाभरात डेंग्यूचे 492 संशयित रुग्ण तर चिकुनगुन्याचे 261 रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच रुग्णांमध्ये वेगळी आणि तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.