Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या उपस्थितीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच फूट पडल्याचे दिसून आलं होतं.

Maharashtra Assembly Winter Session 2023 Live : मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना हिवाळी अधिवेशनातही तो गाजण्याची शक्यता आहे. अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री नवाब मलिक यांच्या विधानभवात सत्ताधारी बाकांवर बसण्यावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरुन अजित पवार यांना पत्र देखील लिहीलं होतं. त्यावरुन आता आजच्या कामकाजात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

8 Dec 2023, 15:55 वाजता

नागपुरात सरकारविरोधात काँग्रेसचं  आंदोलन

Nagpur Congress Andolan : नागपुरात सरकारविरोधात काँग्रेसचं  आंदोलन सुरू. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झालीये. पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. पोलिसांनी नाना पटोलेंना उचलून नेलंय.

8 Dec 2023, 12:56 वाजता

Maharashtra Winter Session Live : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

आंतरवली सराटी येथील आंदोलनात पोलिसांनी लाठीमार केल्याच्या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिलं आहे. याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांवरी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल. तसेच सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही लेखी उत्तरात म्हटले आहे.

8 Dec 2023, 12:52 वाजता

Maharashtra Winter Session Live : मराठा आंदोलकांवर बचावासाठी लाठीमार केला - देवेंद्र फडणवीस

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला होता. हा लाठीमार बचावात्मक होता, असे लेखी उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं आहे.

8 Dec 2023, 11:16 वाजता

Maharashtra Winter Session Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका

"विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरविलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे. सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. पC महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आलेले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे. जनहिताचा, लोकभावनेचा आदर करून अजितदादा पवार योग्य भूमिका घेतील. विरोधी पक्षानेही या विषयावर नाकाने कांदे सोलायची काही गरज नाही. त्यांना तो अधिकार नाही. नवाब मालिक तुरुंगात असताना ते महाविकास आघाडीत मंत्रीपदावर होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. त्यामुळे त्यांना या मुद्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

8 Dec 2023, 11:00 वाजता

Maharashtra Winter Session Live : फडणवीसांच्या पत्रावर मलिकांचा बोलण्यास नकार

आज अधिवेशन संपेपर्यंत आपण पूर्णवेळ थांबणार असल्याचे नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात आले आहेत. मलिक यांना न्यायालयाकडून माध्यमांशी संवाद साधण्यावर बंदी असल्याचे सांगण्यात येतंय.

8 Dec 2023, 10:58 वाजता

Maharashtra Winter Session Live : प्रफुल पटेल यांच्याबद्दल फडणवीस यांचे मत काय?  - संजय राऊत

"नवाब मलिक यांच्यासारखेच आरोप आणि खटला प्रफुल पटेल यांच्यावरही दाखल केलेला आहे. त्यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तीशी व्यवहार झाले आहेत, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याबद्दल ईडीने कारवाईदेखील केली असून पटेल यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यूपीएच्या काळात प्रफुल पटेल मंत्री असताना याच मुद्द्यावर भाजपाने सोनिया गांधी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मग प्रफुल पटेल यांच्याबद्दल फडणवीस यांचे मत काय आहे?," असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

8 Dec 2023, 10:51 वाजता

Maharashtra Winter Session Live : आधी नवाब मलिकांची स्पष्ट भूमिका येऊ द्या - अजित पवार

'कुणी कुठे बसावं हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. इतर कोण काय म्हणालं हे मला माहिती नाही. नवाब मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी भूमिका मांडणार. त्या पत्राचं काय करायचं ते माझं मी बघेन. त्याबद्दल मीडियाला काही सांगण्याचं कारण नाही,' असे अजित पवार म्हणाले आहेत.

8 Dec 2023, 10:48 वाजता

Maharashtra Winter Session Live : फडणवीसांच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी भाजप आणि अजित पवार गटामध्ये विसंवाद असल्याचे चित्र निर्माण झालं होतं. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.