Maharashtra Breaking News LIVE : आजचा दिवसही पाऊस गाजवणार? जाणून घ्या राजकारणापासून पावसापर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर... Live Blog मध्ये
26 Sep 2024, 22:54 वाजता
पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे रविवारी उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता होता.
26 Sep 2024, 21:45 वाजता
खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली
खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु आहे. नदीची धोका पातळी 7 मीटर इतकी आहे. सध्या जगबुडी नदी सहा मीटरवर वाहते आहे. एक मीटर पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर शहराला पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यांने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. गेल्या सात तासांपासून खेडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे
26 Sep 2024, 21:03 वाजता
मंकीपॉक्स संदर्भात केंद्र सरकारच्या सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना
मंकीपॉक्ससंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंकी पॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करावे, सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकी पॉक्सविषयी जागरूकता वाढवावी, मंकी पॉक्सविषयीची माहिती, संसर्गाची माध्यमे याविषयी लोकांना जागरूक करावे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेची समीक्षा करावी रुग्णालयात मंकी पॉक्सचे रुग्ण तसेच संशयित यांच्या विलगीकरणाराच्या, यातायात सुविधा आहेत का, याची खातरजमा करावी
26 Sep 2024, 19:26 वाजता
छगन भुजबळ यांना एअर ॲम्बुलन्स ने पुण्याहून मुंबईला हलवले . 24 तासापासून होता भुजबळ यांना ताप आहे. ताप नियंत्रित होत नसल्याने तसंच घसा दुखणे सांधे दुखणे सारख्या समस्या आहेत. आजार अधिक तीव्र होऊ लागल्याने मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलला उपचारासाठी केले दाखल
26 Sep 2024, 17:08 वाजता
आमदार रोहित पवार यांना अहमदनगरच्या जामखेडमध्ये पोलिसांनी अडवल्यानं वातावरण तापलं होतं. रोहित पवार यांनी SRPF केंद्राच्या लोकापर्णाचं कार्यक्रम आयोजित केला होता, पण याला प्रशासन आणि राज्य राखीव पोलीस दलाने मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ज्यावेळी रोहित पवार जामखेडमध्ये पोहोचले त्यावेळी पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आलं. यावेळी रोहित पवारांचे कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची झाली.
26 Sep 2024, 15:44 वाजता
नालासोपाऱ्यात डोंगराचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही
नालासोपारा पूर्वेकडील बावशेत पाडा येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र येथील शेकडो घरांना धोका निर्माण झाला आहे वसई विरार महानगरपालिकेने पालिकेच्या क्षेत्रातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याचं जाहीर केलं होतं. नालासोपाराच्या पूर्वेकडील बावशेत पाडा येथे काल रात्रीच्या सुमारास धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे येथील शेकडो झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे.
26 Sep 2024, 14:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : मुसळधार पावसानं मुंबईकरांच्या अडचणी पाहून आदित्य ठाकरेंचा संताप अनावर; यंत्रणा कुठे होती? म्हणत खडा सवाल
मुसळधार पावसामुळं मुंबई ठप्पझाली तेव्हा आपातकालीन यंत्रणा कुठे होती? टोळ्यांनी सगळी कंत्राटं वाटून घेतली आहेत. मेट्रोची गर्दी, रेल्वेची गर्दी, वाहतूक कोंडी... मुंबईचं इतकं भयानक चित्र कधीही पाहिलं नव्हतं. आज मुंबई, ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आजुबाजूला जे गराडा घेऊन फिरतात तेच पोलीस बंदोबस्ताला लावले असते तर नागरिकांची गैरसोय झाली नसती. या सरकारचं प्राधान्य खोके आणि पैशांना.... म्हणत ओढले ताशेरे.
26 Sep 2024, 13:32 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवाजी महाऱाजांचा पुतळा कोसळला
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर असणारा शिवरायांचा पुतळा चुकीच्या वेल्डिंग कामामुळे कोसळला असं चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं. शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागला, कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असं समितीच्या 16 पानी अहवालात सांगण्यात आलं.
26 Sep 2024, 13:04 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : हॉटेलच्या महिला स्वच्छतागृहात छुपा मोबाईल ठेवून विडिओ काढण्याचा प्रयत्न
नवी मुंबईतील वाशी मधील विशियस सर्कल या हॉटेल मधील महिला स्वच्छतागृहात हॉटेल कर्मचाऱ्याने छुप्या पद्धतीने आपला मोबाईल फोन ठेऊन चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हॉटेल मध्ये आलेल्या महिला ग्राहकाच्या सदर बाब लक्षात आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी वाशी पोलिसांनी हॉटेल मधील महिला स्वच्छतागृहात ठेवलेला मोबाईल ताब्यात घेतला. हे कृत्य करणाऱ्या हॉटेल कर्मचारी अजय सिंह याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली असून वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.
26 Sep 2024, 12:55 वाजता
Maharashtra Breaking News LIVE : वक्फ विधेयकावरील संसदिय संयुक्त समितीच्या बैठकीत राडा
वक्फ विधेयकावरील संसदिय संयुक्त समितीच्या बैठकीत राडा झाला असून, या राड्यामागोमाग विरोधी पक्षांनी केला सभात्याग. शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि टीएमसीचे कल्याण बॅनर्जी यानंतर एकमेकांमध्ये भिडले. गुलशन फाऊंडेशनच्या वतीने समितीसमोर म्हणणं मांडले जात असताना कल्याण बॅनर्जी यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
अखेर विरोधी पक्षांच्या सगळ्या प्रतिनिधींनी बैठकीतून बाहेर पाडण्याचा निर्णय घेतला