Maharashtra Breaking News LIVE : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Maharashtra Breaking News LIVE : महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडींना वेग आलेला असताना इथं अचानकच पावसानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.     

Maharashtra Breaking News LIVE : पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचे  रविवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Maharashtra Breaking News LIVE : आजचा दिवसही पाऊस गाजवणार? जाणून घ्या राजकारणापासून पावसापर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर... Live Blog मध्ये 

 

26 Sep 2024, 09:13 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : कळवाडी फाट्यावर काटेरी झुडपात सापडले अर्भक

वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे काही ठिकाणी मुलगी जन्माला आल्यानंतर निर्दयीपणे त्या लहानशा नकोशीला टाकून देण्यात येत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहे. मात्र मालेगाव तालुक्यातील कळवाडी फाटा परिसरात नुकतेच जन्माला आलेले पुरुष जातीचे अर्भक कापडात लपेटून काटेरी झुडपात टाकून देण्यात आल्याची घटना समोर आली. स्थानिक दांम्पत्याने प्रसंगवधान राखत त्या बालकाला कळवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले असून जन्मताच आईच्या दूधाच्या दोन थेंबांसाठी टाहो फोडून फोडून हे बाळ कासावीस झाल्याने ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

26 Sep 2024, 09:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : संजय राऊत आज दिल्लीला जाणार

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज दिल्लीला जाणार असून तिथं ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. राज्यातील तिढ्याच्या जागावाटपाबाबत चर्चा होणार असून, राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून लागलेली चढाओढ हे योग्य नसल्याचेही वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याची माहिती. 

 

26 Sep 2024, 09:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : गरज भासल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण बदलणार

पुण्यात एसपी कॉलेज मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा असली तरीही पावसाची चिन्हं पाहता गरज भासल्यास मोदींच्या सभेचं ठिकाण बदलणार असल्याची शक्यता आहे. यासाठी गणेश कला क्रीडा मंचामध्ये तयारी सुरू करण्यात आली असून, पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. 

26 Sep 2024, 08:52 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : फेसबुक वर जावून किंवा रिल्स काढून आमदार होता येत नाही- पंडित पाटील 

फेसबुकवर जावून किंवा रील काढून आमदार होता येत नाही. त्यासाठी जनतेत जावून त्यांची कामं करायला पाहिजेत. असा टोला शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्याच पक्षातील इच्छुकांना लगावला. विधानसभेसाठी पंडित पाटील अलिबाग मधून इच्छुक आहेत. आपली पक्ष नेतृत्वावर कुठलीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पक्ष नेतृत्वाला सगळ्यांना सोबत घेवून काम करायला लागतं. पक्षात अनेकजण इच्छुक आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. परंतु नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या भावना जाणून उमेदवाराची निवड करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

26 Sep 2024, 08:49 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : फेसबुक वर जावून किंवा रिल्स काढून आमदार होता येत नाही- पंडित पाटील 

फेसबुकवर जावून किंवा रील काढून आमदार होता येत नाही. त्यासाठी जनतेत जावून त्यांची कामं करायला पाहिजेत. असा टोला शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्याच पक्षातील इच्छुकांना लगावला. विधानसभेसाठी पंडित पाटील अलिबाग मधून इच्छुक आहेत. आपली पक्ष नेतृत्वावर कुठलीही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. पक्ष नेतृत्वाला सगळ्यांना सोबत घेवून काम करायला लागतं. पक्षात अनेकजण इच्छुक आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. परंतु नेतृत्वाने कार्यकर्त्यांच्या भावना जाणून उमेदवाराची निवड करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

26 Sep 2024, 07:59 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : मुंबईत पुन्हा मॅनहोल्सचा प्रश्न ऐरणीवर

काल रात्री मुंबईत जोरदार पाऊस पडला आणि यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सकाळ भागात पाणी साचले होते तर रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते यातच अंधेरी या ठिकाणी पाण्याचा अंदाज आल्याने एका महिलेचा मेन हॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला चिप्स कंपनीच्या गेट क्रमांक तीन समोर चेंबर मध्ये पडून विमल अप्पाशा गायकवाड या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला का रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना झाली याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाने महिलेचा शोध घेतला तिचा मृतदेह मिळून आला.

26 Sep 2024, 07:57 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा

कसा असेल निवडणूक आयोगाचा दौराः

26 सप्टेंबरः
केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार. 

27 सप्टेंबर
सकाळी 10 वाजताः राजकीय पक्षांसोबत बैठक होईल
दुपारी 1 वाजताः सीईओ, नोडल अधिका-यांशी बैठक होईल.

दुपारी 3 वाजताः निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिका-यांनी बैठक होईल.

संध्याकाळी 5 वाः मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यांशी महत्त्वाच्या बैठका

28 सप्टेंबर सकाळी 9.30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांची बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील.
त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होणार.

26 Sep 2024, 07:41 वाजता

शरद पवारांची उद्या पुण्यात सभा

 

Pune Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात सभा घेणार आहेत. तर मोदींच्या सभेनंतर उद्या शरद पवारही पुण्यात सभा घेणार आहेत. या सभेत पवारांच्या उपस्थितीमध्ये काही मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.. त्यामुळे शरद पवार कोणत्या पक्षाला धक्का देणार याची उत्सुकता निर्माण झालीये.. उद्या संध्याकाळी 6वाजता खराडी इथं झेन्सार कंपनीच्या मैदानात परावांची ही सभा होणार आहे. 

26 Sep 2024, 07:35 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा

 

Prime Minister Narendra Modi In Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौ-यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचं भूमिपूजन होणार आहे. तसंच त्यांची सभाही होणार आहे.  मोदींच्या या दौ-यावर पावसाचं सावट आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सभास्थळी चिखल झालाय. तर दुसरीकडे या दौ-याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत आज बदल करण्यात आलाय. काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासून वळवण्यात येणारेय

26 Sep 2024, 07:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE : पाऊसपाण्याचा अलर्ट... 

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून, सकाळी 8.30 वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईभर पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज असून, मुंबईसह ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर पालघरसाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची वर्तवण्यात आली आहे.