Maharashtra Breaking News LIVE Updates: धनगर समाजाचे 'वर्षा'बाहेर आंदोलन, कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलं भेटीला

विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE Updates: धनगर समाजाचे 'वर्षा'बाहेर आंदोलन, कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलं भेटीला

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.

8 Oct 2024, 13:29 वाजता

महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक

आज महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक होतेय..तिढा असलेल्या काही जागांवर अद्यापही सहमती न झाल्याने आजही चर्चा सुरू राहणारेय....तसंच प्रचाराची रणनितीही या बैठकीत ठरवली जाणारेय....संयुक्त मेळाव्याचे नियोजनही आजच्या बैठकीत होणार आहे.

8 Oct 2024, 13:28 वाजता

सोलापुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम

सोलापुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणारेय... या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुउपस्थित असणारेय.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणारेय..