Jarange insists on hunger strike : मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणावर ठाम

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jarange insists on hunger strike : मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणावर ठाम

24 Oct 2023, 23:41 वाजता

मुख़्यमंत्री शिंदेंनी शपथ घेतल्यानंतरही जरांगे उपोषणावर ठाम

 

Jarange insists on hunger strike : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यात शिवरायांची शपथ घेतल्यानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही मराठा समाजासाठी चांगली बाब आहे. मात्र आपण आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

24 Oct 2023, 21:16 वाजता

Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'सत्तेसाठी हिंदूत्वाला तिलांजली''मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंनी संधीसाधूपणाट,'2024ला पुन्हा मोदीच सत्तेत येणार','राज्यातून45+ जागा जिंकून देणार','मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार','इतरांवर अन्याय होऊ देणार नाही', मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शिवरायाची शपथ.

24 Oct 2023, 20:55 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'विमा कंपन्या सरकारला जुमानत नाहीत','1 रुपयात पीकविमा, पण भरपाई नाही मिळाली','पीकविमा कंपन्यांना घेरावा घाला','पाक खेळाडूंना भाजपमध्ये घ्या', उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा.

24 Oct 2023, 20:46 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'हिंमत असले तर पीएम केअर फंडाची चौकशी करा', 'उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर बुडबून दाखवलं','पीएम केअर फंडात घोटाळा','रतन टाटांनी दिलेले पैसे कुठे गेले?','ज्यांच्या घशात धारावी घातली तो कोण?','आता धारावीदेखील गिळायला निघाले','मला माहित नाही मी अडाणी नाही', उद्धव ठाकरे यांचा अदानीवर हल्लाबोल.

24 Oct 2023, 20:35 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'उद्या आपलं सरकार येणार','आपलं सरकार आल्यानंतर उलट टांगू','मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दरात','मुंबई महापालिकेच्या ठेवींवर डोळा','मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे करू','सुरत लुटलं म्हणून महाराष्ट्राची लूट','सुरतला पळता यावं म्हणून बुलेट ट्रेन','शिवरायांनी सुरत लुटलं, हे सुरतला पळाले', उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल.

24 Oct 2023, 20:29 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'मोदी घराणेशाहीवर टीका करतात', 'हो, मी घराणेशाहीचा पाईक','मला माझ्या कुटुंबाचा अभिमान','जो कुटुंब मानत नाही त्याला काय कळणार?','माझा महाराष्ट्रचं माझं कुटुंब','कोरोना काळात हे कुटुंब जपलं', उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य.

24 Oct 2023, 20:17 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'हे दोन हाफ कमळा पसंदवाले','जरांगेंचा लढा योग्य पद्धतीनं सुरू','जालन्याचा डायर कोण आहे? चौकशी करा','पोलीस एवढे रानटी कसे होऊ शकतात','मराठा आंदोलकांवर निर्घृण अत्याचार','कोर्टानं अध्यक्षाचे कान फोडले''कोर्टानं कान फोडले तरी निर्लज्जम सदासुखी', उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना टोला.

24 Oct 2023, 20:08 वाजता

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today : 'रामाला रावणाचा वध करावा लागला','रावण माजला होता म्हणून त्याचा वध','मशालीनं खोक्याची लंका दहन करणार','सरकारमध्ये कमळा पसंदवाले','शाहरुख, अजय, अक्षय कमला पसंतवाले', उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल.

24 Oct 2023, 20:02 वाजता

Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'शाह अजित पवारांना उलटे लटकवणार होते','घाबरून अनेक घोटाळेबाज भाजपसोबत','अमित शाह म्हणतात उलटे लटकवू','भाजप सरकारकडून महाराष्ट्राची लूट' संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल.

24 Oct 2023, 19:56 वाजता

Sanjay Raut Live | Marathi News LIVE Today : 'अब की बार ठाकरे सरकार','राज्यातच नव्हे, दिल्लीतही ठाकरे सरकार', मुश्रीफांनी आजच कबुली दिली','भाजपच्या दबावामुळे तुरुंगात जाणार होते','एकनाथ शिंदे हा एक मोठा घोटाळा', खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला.