24 Oct 2023, 09:32 वाजता
दसरा मेळाव्याचा राजकीय आखाडा
Dasara Melava : दस-याच्या दिवशी आज राजकीय आखाडा पाहायला मिळणार आहे.. कारण दस-यानिमित्त मुंबई, पुणे, बीडमध्ये राजकीय मेळाव्यांचा झंझावात पाहायला मिळेल.. मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा पार पडेल.. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी शिवाजी पार्कवरचे दसरा मेळावा गाजले.. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले. शिंदे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्याच आझाद मैदानावर होणार आहे.. त्यासोबतच भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होईल. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंनी हा परंपरा सुरु केली होती. तीच परंपरा पंकजा मुंडे पुढे घेऊन जाताना दिसतायत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. या यात्रेचा शुभारंभ आज पुण्यात होणार आहे. यानिमित्त होणा-या सभेत शरद पवार संबोधित करणार आहेत.. तेव्हा आजच्या या सर्व दस-या मेळाव्यांमध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे आणि शरद पवार काय राजकीय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
24 Oct 2023, 09:19 वाजता
सीएसएमटी-मडगाव वंदे भारत दररोज धावणार
Mumbai-Goa Vande Bharat Express : कोकणात तसंच गोव्याला जाणा-यांसाठी आनंदाची बातमी.. कारण सीएसएमटी-मडगाव वंदे भारत आता दररोज धावणार आहे.. राज्यातून मान्सूनने निरोप घेतल्याची अधिकृत घोषणा झाली. त्यामुळे आता 1 नोव्हेंबरपासून गैर मान्सून वेळापत्रकानुसार वंदे भारत धावेल.. सध्या ही एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावते. मात्र आता ती शुक्रवार वगळता दररोज धावेल. तेव्हा दिवाळी सुट्टी तसंच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्याला जाणा-या प्रवाशांसाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.. त्यासोबतच कोकण रेल्वेवर राजधानीसह 88 गाड्यांचा वेगही वाढणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
24 Oct 2023, 08:15 वाजता
डेंग्यूवर मिळालं पहिलं औषध
Dengue Medicine : जगभरात धुमाकूळ घालणा-या डेंग्यू या रोगावर पहिलं औषध मिळालंय.. मानवी चाचणीत हे औषध यशस्वी झाल्याचा दावा जॉन्सन अँड जॉन्सननं केलाय.. 10 लोकांवर या औषधाची चाचणी करण्यात आली.. त्यांना सलग 21 दिवसात 21 गोळ्या देण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्यात रोगप्रतिकारशक्ती तर वाढली, शिवाय विषाणूचे म्युटेशनही रोखण्यात आले... आता या औषधाची दुसरी चाचणी यशस्वी झाल्यास 3 विविध देशांमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
24 Oct 2023, 08:11 वाजता
नाशिकमध्ये ड्रग्ज मोठा साठा जप्त
Nashik Drugs Seized : ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी मुंबई पोलीस आणि देवळा पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केलीय...ललित पाटीलचा सहकारी सचिन वाघने नदी पात्रात लपवलेलं ड्रग्ज हस्तगत करण्यात आलंय...ठेंगोडा गावाजवळ गिरणा नदीपात्रातून पोलिसांनी तब्बल 15 किलो ड्रग्ज जप्त केलंय...ललित पाटीलवर कारवाई झाल्यानंतर कारखान्यातील ड्रग्ज लपवून ठेवण्यासाठी सचिन वाघने ड्रग्ज नदीत लपवून ठेवलं...मात्र, त्याची ही युक्ती जास्त काळ टिकू शकली नाही...मुंबई पोलिसांनी वेगानं तपास करून लपवलेलं ड्रग्ज ताब्यात घेतलंय...यासाठी मुंबई पोलिसांनी स्कुबा ड्रायव्हिंगची मदत घेतली...आणि रात्रभर नदीपात्रात शोध घेऊन ड्रग्जचा साठा हस्तगत केलाय..
बातमी पाहा - नाशिकमधील गिरणा नदीत सापडले कोट्यवधीचे ड्रग्ज, ललित पाटील प्रकरणात धक्कादायक खुलासा, संशय येऊ नये म्हणून...
बातमीचा व्हिडीओ पाहा -