Jarange insists on hunger strike : मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणावर ठाम

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Jarange insists on hunger strike : मराठा आरक्षणासाठी जरांगे उपोषणावर ठाम

24 Oct 2023, 16:26 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'जातीला न्याय देण्यासाठी आंदोलन उभं केलं','मराठा आणि धनगरांचं दु:ख एकच','धनगरांची लाट उसळल्यास कुणी रोखणार नाही','प्रत्येक सरकार नवनवीन आश्वासन देतं','सरकारनं अनेक डाव टाकलं आपण डाव उधळले','सरकारला आरक्षण द्यावंच लागेल','धनगरांना पेटून उठावं लागेल','आम्ही धनगरांच्या पाठिशी', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.

24 Oct 2023, 16:18 वाजता

Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'धनगर बांधवांनी मनावर घेतलं तर आरक्षण मिळालंच समजा', 'सरकार खडबडून जागं व्हायला हवं','आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही', 'धनगरांनी मनावर घेतल्यास आरक्षण मिळणारच','छाताडावर बसणार, पण आरक्षण घेऊनच राहणार', मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा.

24 Oct 2023, 16:04 वाजता

लातूरमध्ये देशमुख कुटुंबाचा ताफा अडवला

 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी राजकीय नेत्यांना केलेल्या गावबंदींचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. याचा फडका लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनाही बसलाय. माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि माजी मंत्री दिलीप देशमुख लातूरच्या रेणा सहकारी कारखान्यावर जाताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा रस्त्यात अडवला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अमित देशमुखांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम होते. यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात करण्यात आला होता. 

24 Oct 2023, 14:35 वाजता

Pankaja Munde Live | Marathi News LIVE Today : 'पंकजा मुंडेंची निष्ठा लेचीपेची नाही ','पदं न मिळता निष्ठा काय असते विचारा','माझ्या आयुष्यात नितीमत्ता','जिंकण्यासाठी गहाण ठेवू शकत नाही','आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू','मी कर्जदार तुमची आहे','मी जनतेची कर्जदार, माझ्यावर मालकी जनतेची','दुसऱ्याचं हडपून खाणाऱ्यातलं मी नाही','मी जनतेची ताईसाहेब नाही, मी आई आहे''मुंडेंच स्मारक अजून सरकार बनवू शकलं नाही', पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

24 Oct 2023, 14:23 वाजता

Pankaja Munde Live | Marathi News LIVE Today : 'हारले तरी मी तुमच्या नजरेतून उतरले नाही','माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही''राज्यात अनेक गंभीर प्रश्न','मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर','ओबीसी आरक्षणाबाबतही अस्वस्थता','माझ्या मुलाआधी तुमची जबाबदारी','मला तुम्ही प्रेम दिलं'.,'गोरगरिबांना न्याय मिळवून देणारच', पंकजा मुंडे यांचं वक्तव्य.

 

24 Oct 2023, 14:03 वाजता

Pankaja Munde Live | Marathi News LIVE Today : 'सर्व समाजाकडून माझं स्वागत','पूर्ण देशात आवाज पोहोचला पाहिजे','कारखान्यासाठी 11 कोटी जमवलात','कारखान्यावर छापा पडला तेव्हा तुम्ही पैसे जमा केले','2 दिवसांत कारखान्यासाठी 11 जमवलेत','कातड्याचे जोडे करूनही उपकार फेडणं अशक्य','ऊसतो़ड कामगारांना पैसे वाढवून द्या', पंकजा मुंडे यांची मागणी.

24 Oct 2023, 13:39 वाजता

 माजी खासदार निलेश राणे राजकारणातून निवृत्त

 

Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणेंनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय.. राजकारणात आता मन रमत नाही असं निलेश राणेंनी X या सोशल मीडियावर जाहीर केलंय.. राजकारणात खूप काही शिकायला मिळालं.. मात्र आता निवडणूक लढवणं वैगरे यात मला रस नाही असं म्हणत निलेश राणेंनी निवृत्तीची घोषणा केलीय.. निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे चिरंजीव तर आमदार नितेश राणे यांचे मोठे भाऊ आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Oct 2023, 12:31 वाजता

शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

 

Sangli Accident : दसरा मेळाव्यासाठी मुंबईला येणा-या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या गाडीला भीषण अपघात झालाय.. या दुर्घटनेत शिंदे गटाचा एक पदाधीकारी जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत..  कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणा-या रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण इथं हा अपघात झाला.. ट्रकनं या पदाधिका-यांच्या गाडीला मागून धडक दिली... या गाडीमध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Oct 2023, 11:19 वाजता

निवडणुकीत मतांसाठी भडकावलं जाईल-सरसंघचालक

 

Nagpur Mohan Bhagwat : निवडणुकीवेळी समाजात फूट पाडणा-यांपासून दूर राहा असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय...येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीला लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होतील...त्यावेळी निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मतं मिळवण्याचे प्रयत्न होत असतात...त्यामुळे समाजात फूट पाडणाऱ्यांपासून दूर राहा...असं आवाहन सरसंघचालकांनी जनतेला केलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Oct 2023, 10:03 वाजता

मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्यानं घ्यावा - मनोज जरांगे-पाटील

 

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली डेडलाईन आज संपतेय.. मराठा आरक्षण आंदोलन गांभीर्याने घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी झी २४ तासच्या माध्यमातून राज्य सरकारला केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला पक्के आहेत.. ते मराठा आरक्षण देतीलच असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय.. नाहीतर 25 तारखेनंतर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मंत्री गिरीश महाजनांनी फोन केल्याची माहितीही जरांगे पाटील यांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -