Encounter in Jammu and Kashmir: दक्षिण काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातील चिनिगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र, या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत ही चकमक सुरू होती. भारतीय लष्करी सेनेकडून दहशतवाद विरोधी अभियान सुरू होते. एक अभियान मोदरगाव येथे सुरू होते. तर त्या व्यतिरिक्त फ्रिसल कुलगान येथे चकमक सुरू होती.
भारतीय लष्कराचे पहिले अभियान सुरू झाल्यानंतर काहीच तासांत चिलिगावमध्ये गोळीबारीच्या घटना सुरू झाल्या. सेनेला दहशतवाद्या कारवायांबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सेनेने धाड टाकत अभियान सुरू केले. यावेळी दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार होत होता. सेनेला कुलगाम परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांविरोधातही गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. त्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.
चिन्नीगाम येथे सर्वात मोठी चकमक झाली. दहशतवादी एका घरात दडून बसल्याचे कळाल्यानंतर जवानांनी त्या घराला वेढा घातला. पण आत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा विभागीय कमांडर फारुक नल्लीचाही समावेश आहे.
दरम्यान, मोदरगाम येथेही चकमक झाली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. त्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. या भागात अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती येतेय. या भागात तीन ते चार दहशतवादी लपले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
शनिवारी जम्मू - काश्मीर येथील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. यातील एक सैनिक प्रविण जंजाळ हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील आहेत .प्रवीण जंजाळ हे 32 वर्षाचे होते ते 2022 मध्ये सैन्यात भरती झाले होत. एक चार महिन्याआधी ते रजेवर आले होते आणि महिन्याभरापूर्वीच त्यांचं लग्न पार पाडलं होतय आज त्यांचं पार्थिव त्यांच्या गावी पोहचणार असून उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.