Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 08 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

8 Jul 2024, 22:37 वाजता

कोकण-कोल्हापूरला जाणारा फोंडा घाट बंद

 

Fonda Ghat : कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.. कारण कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय. त्यामुळे करूळ घाटानंतर आता फोंडाघाटही अवजड वाहनांना बंद राहणार आहे.. त्यासोबतच देवगड- निपाणी रस्त्यावरही अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. रस्त्यावरील पाईप खचल्याने दुरूस्तीसाठी हा रस्ता बंद राहणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Jul 2024, 21:23 वाजता

उद्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात सर्व शाळांना सुट्टी जाहीर

 

School Holiday : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातून मोठी बातमी समोर येतेय.. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी हा आदेश दिलाय.. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या तसंच सर्व व्यवस्थापनांच्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा तसंच बारावीपर्यंत कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलीय. तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलीय. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजना सुट्टी देण्यात आलीय.

8 Jul 2024, 21:07 वाजता

31 जुलैपर्यंत रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग बंद राहणार 

 

Raigad Fort : किल्ले रायगडावर ढगफुटीसारखा पाऊस झालाय. किल्ल्याच्या पाय-यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहताना दिसतायेत. यामुळे पर्यटकांची तारांबळ उडालीये. परतीच्या मार्गावर किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले. काहींनी संरक्षक कठड्यावर उभे राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून स्वत:चा जीव वाचवला. रविवारी असल्यानं रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या प्रमाणात होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांचे हाल झाले. प्रशासनाने आता रायगड किल्ल्यावर जाणारा रोप वे आणि पायरी मार्ग बंद केलाय.. रायगडचा पायरी मार्ग आजपासून 31 जुलै पर्यंत बंद राहणार आहे.

8 Jul 2024, 20:13 वाजता

किल्ले रायगडावर ढगफुटीसदृश पाऊस

 

Raigad Fort Rain : किल्ले रायगडावर ढगफुटीसारखा पाऊस झालाय. किल्ल्याच्या पाय-यांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहताना दिसतायेत. यामुळे पर्यटकांची तारांबळ उडालीये. परतीच्या मार्गावर किल्ल्याच्या भिंतींचा आधार घेत एकमेकांना पकडून पर्यटक कसेबसे खाली उतरले. काहींनी संरक्षक कठड्यावर उभे राहून तर अनेकांनी बॅरीगेटींगला पकडून स्वत:चा जीव वाचवला. रविवारी असल्यानं रायगडावर आलेल्या पर्यटकांची संख्या प्रमाणात होती. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांचे हाल झाले.

8 Jul 2024, 19:15 वाजता

CNG  आणि घरगुती पाईप गॅस दरात वाढ

 

CNG Gas Price : सीएनजी आणि पाईप गॅस दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस कंपनीनं घेतलाय.. त्यानुसार सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.50 रुपयाने वाढ करण्यात आलीय. तर घरगुती पाईप गॅसच्या किंमती 1 रुपयाने वाढणार आहेत... सोमवारी मध्यरात्रीपासूनच ही नवी दरवाढ लागू होणाराय.. त्यामुळं आता सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो होईल. तर घरगुती पाईप गॅसची किंमत 48 रुपये प्रति SCM एवढी असेल...

8 Jul 2024, 18:15 वाजता

वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाहाला जामीन मंजूर 

 

 Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शाह यांना शिवडी कोर्टानं  जामीन मंजूर  केलाय...15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर राजेश शहा यांची अटक कोर्टाने ठरवली बेकायदेशीर तर चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी

बातमीचा व्हिडीओ पाहा-

8 Jul 2024, 17:12 वाजता

पाय घसरून महिला रेल्वे रुळावर पडली, बेलापूर-सीबीडी रेल्वे स्टेशनवरील घटना

 

Belapur Train Accident : रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांची गर्दी यातच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनवर घडली.... पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर-सीबीडी रेल्वे स्टेशनला आली. रेल्वे विस्कळीत असल्यामुळे जी रेल्वे येईल ती पकडण्यासाठी गर्दी होती. याचदरम्यान एका महिलेचा पाय घसरून ती रुळावर पडली. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. मात्र रेल्वे आणि पोलिस प्रशासनाने काही वेळातच रेल्वे मागे घेतली. महिला रेल्वे रुळामध्ये झोपून राहील्याने तिचा जीव वाचला मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाहीत. या अपघाताचा थरार कॅमेरात चित्रित झालाय. 

8 Jul 2024, 16:41 वाजता

वरळी हिट  अँड  रन प्रकरण, मुख्य आरोपी  मिहिर शहाविरोधात लूक आऊट नोटीस जारी

 

Worli Hit and Run Case : वरळी हिट  अँड  रन प्रकरण...मुख्य आरोपी मिहीर शहाच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी...मुंबई पोलीसांकडून तपास सुरू...अपघात झाल्यापासून मिहीर फरार

8 Jul 2024, 16:20 वाजता

हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत, वाशी-सीएसएमटी मार्गाची वाहतूक सुरळीत

 

Harbour Railway : वाशी ते सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरळीत...वाशी रेल्वे स्थानकातून मुंबईकडे जाणारी लोकल सुरू....वाशीहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली गाडी रवाना....जोरदार पावसानंतर हार्बर रेल्वे मार्ग अखेर सुरळीत

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

8 Jul 2024, 15:51 वाजता

मुंबईसह सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता

 

Mumbai Rain : मुंबईसह सातारा कोल्हापुरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे...सातारा कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय...पुढील काही तास मुंबईसह उपनगरांत पाऊस थैमान घालणारे...हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय...मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीये...हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिलीये...