Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

LIVE Updates on JULY 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Jul 2024, 13:13 वाजता

'रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगतात'​, शरद पवार गटांची अजित पवारांवर टीका

 

Sharad Pawar Group on Ajit Pawar : बारामतीतील अजित पवारांच्या सभेवरून शरद पवार गटानं निशाणा साधलाय. सभेतील रिकाम्या खुर्च्या तुमचं भविष्य सांगत आहेत. जनता गद्दारीला क्षमा करत नाही. गद्दारी स्वीकारायला जनता तयार नाही, अशा शब्दांत शरद पवार गटानं 'एक्स' हँडलवरून टीका केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15 Jul 2024, 12:43 वाजता

खेडकर कुटुंब पुण्यातून फरार?

 

Pooja Khedkar  Family : पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत

बातमीचा व्हिडीओ पाहा-

15 Jul 2024, 11:38 वाजता

अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?

 

Ajit Pawar : 'झी 24 तास'वर आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय...अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...वंचित, MIMसोबत विधानसभेत वेगळे आव्हान निर्माण करणार करण्याची तयारी आहे...छगन भुजबळ असुरक्षित झाल्याची भावना-सूत्र...भाजपची नवीन खेळी असल्याची सूत्रांची माहिती

15 Jul 2024, 11:12 वाजता

पुणेकरांनो काळजी घ्या ! झिका रुग्णांची संख्या वाढली

 

Pune Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसने डोकं वर काढलंय...एकट्या पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर गेलीय. त्यामुळे पुणेकरांना झिका हळूहळू घेरतोय, असं चित्र दिसतंय. राज्यात 25 रुग्णांची नोंद झालीये. तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्येही झिकाचा शिरकाव झालाय. दोन्ही शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय. रुग्णांमध्ये महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. मात्र अद्याप लहान मुलांना याचा धोका नाहीये. मात्र गर्भवती स्त्रियांना झिकाचा धोका अधिक आहे. याने बाळाचा मेंदू लहान होण्याची शक्यताय. तसंच मुदतपूर्व प्रसुती देखील होऊ शकते.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15 Jul 2024, 10:25 वाजता

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भुजबळ-पवार भेटीचं कारण गुलदस्त्यात

 

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शरद पवारांची भेटीला पोहोचलेयत...मात्र, भुजबळ-पवारांच्या भेटीचं कारण अस्पष्ट आहे...या भेटीमुळे राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आलंय...ही भेट नक्की कशासाठी आहे हे कळू शकलेलं नाहीये...कालच भुजबळांनी अजित पवारांच्या मेळाव्यातून पवारांवर टीका केली होती...आरक्षण बैठकीला विरोधकांना पवारांचा फोन आल्याने ते बैठकीला आले नाहीत असा गंभीर आरोप भुजबळांनी केला होता...त्यानंतर आजच भुजबळ पवारांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यायत...

 

15 Jul 2024, 10:01 वाजता

निकाल विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची उद्धव ठाकरेंची धमकी?

 

Mahavikas Aghadi : विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय...ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्याने विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगलंय...सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेस नेते दोन गट पडले होते...त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी दिली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15 Jul 2024, 09:29 वाजता

IAS अधिकारी पूजा खेडकरचं दिव्यांग, ओबीसी प्रमाणपत्र तपासणार?

 

Pooja Khedkar Case : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी पीएमओ कार्यालयाकडून दखल घेण्यात आलीय...पूजा खेडकरचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यताय...यासोबतच पूजाला दिव्यांग प्रमाणपत्र देणा-या डॉक्टरांचीही चौकशी होणाराय...पीएमओ कार्यालयाने पुणे जिल्हाधिका-यांकडून हा अहवाल मागवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

15 Jul 2024, 09:04 वाजता

राज्यातील वारकऱ्यांसाठी खूशखबर ! पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना पेन्शन मिळणार

 

Warkari Pension : पारी वारी करणा-या वारक-यांना पेन्शन मिळणार आहे...राज्यातील कीर्तनकार आणि वारक-यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय...परंपरेने महिन्याची पायी वारी करणा-या वारक-यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात वारकरी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे...राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती...या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूरात असणार आहे...महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल...या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15 Jul 2024, 08:30 वाजता

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत...कल्याणमध्ये गोरखपूर एक्स्प्रेसच्या ब्रेक लायनरला आग...ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील घटना

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

15 Jul 2024, 08:02 वाजता

रत्नागिरीत तरुण धरणाच्या पाण्यात गेला वाहून

 

Sheldi Dam : खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून तरुण वाहून गेलाय. जयेश आंब्रे असं वाहून गेलेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मित्रांच्या डोळ्यांदेखतच हा तरुण वाहून गेला. मात्र पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांना काहीही करता आलं नाही. वाहून गेलेल्या तरुणाला शोधण्याचं काम सुरुय.