Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

LIVE Updates on JULY 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

15 Jul 2024, 22:47 वाजता

Aashadhi Wari Special Train : आषाढी एकादशीसाठी भाजप भाविकांकरता विशेष ट्रेन सोडणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हे नियोजन केलंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. यामुळे विठू माऊलींच्या दर्शनासाठी जाणा-या भाविकांना दिलासा मिळालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Jul 2024, 20:55 वाजता

Harshawardhan Patil : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवामध्ये केलं. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभात ते बोलत होते. विशेष म्हणजे धैर्यशील माने यांचं विजयासाठी अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी हे विधान केलं. यामुळे खळबळ उडाली असून, यातून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Jul 2024, 20:17 वाजता

Uddhav Thacekray : उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला... ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, असं वक्तव्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलंय.. शंकराचार्यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान केला.. यावेळी शंकराचार्यांनी हे वक्तव्य केलं. माझं राजकारणाशी देणंघेणं नाही, सत्य तेच बोलतो, असं ते म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Jul 2024, 19:27 वाजता

शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यास मुदतवाढ

 

Pik Vima : महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतक-यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतक-याना 31 जुलैपर्यंत पीकविमा भरता येणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार  केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतक-यांना पीकविमा भरण्यासाठी, 31 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. 

 

15 Jul 2024, 17:01 वाजता

मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट

 

Rain Alert : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय..तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ड देण्यात आलाय...कोल्हापूर, संभाजीनगर, जालना आणि परभणीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय...हवामान विभागानं हा अलर्ट जारी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Jul 2024, 16:29 वाजता

आदित्य ठाकरेंचा उद्या कर्जत, उरण विधानसभेचा दौरा

 

Aaditya Thackeray : ठाकरे गटाचं मिशन विधानसभा सुरू झालंय...आदित्य ठाकरे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे सुरू करताय..उद्या ते कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणारेत...आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पदाधिका-यांशी संवाद साधणारेत...दुपारी अडीच वाजता कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे ते पदाधिका-यांशी संवाद साधतील...तर सायंकाळी पाचच्या सुमारास उरण विधानसभा येथील जेएनपीटी येथील मल्टीपर्पज हॉल येथील पदाधिका-यांकडून परिस्थिती जाणून घेणार आहेत...

15 Jul 2024, 16:21 वाजता

विशाळगडावरील हिंसाचार मनाला वेदना देणारा - शाहू महाराज

 

Kolhapur Shahu Maharaj : विशाळगड अतिक्रमण मुद्द्यावरून झालेला हिंसाचार मनाला प्रचंड वेदना देणारा असल्याची प्रतिक्रिया, खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रगल्भ असलेल्या जिल्ह्यात अशी घटना घडणं हे अत्यंत क्लेशदायक असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यानी सरकार, प्रशासन आणि पोलिसांवरही ताशेरे ओढले. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभिर्यानं घेतली गेली नाही अशी टीका त्यांनी केली. उद्या शाहू महाराज विशाळगडला भेट देणार आहेत. 

15 Jul 2024, 15:50 वाजता

राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कॅगकडून चिंता व्यक्त

 

Maharashtra State CAG Report : राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कॅगकडून चिंता व्यक्त करण्यात आलीय...वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा असे ताशेरे कॅगने सरकारवर ओढलेयत...महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत चाललेल्या तफावतीमुळे तिजोरीवर भार वाढत असल्याचे निरीक्षण सुद्धा नोंदवलंय...2022-23 या वर्षाच्या महाराष्ट्र राज्य वित्त लेखापरीक्षण अहवालाने राज्य सरकारला वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची शिफारस केलीय...राज्यावरील कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर गेलाय...कर्जाचे हे प्रमाण उत्पन्नाच्या 18.73 टक्के आहे. हे प्रमाण 18.14 टक्के अपेक्षित आहे...मात्र, ते वाढत असल्याने सरकारच्या तिजोरीवर अधिक बोजा वाढणार आहे...यामुळे कॅगने सरकारला सावधतेचा इशारा दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

15 Jul 2024, 15:19 वाजता

पूजा खेडकर यांची कागदपत्र सापडली

 

Pooja Khedkar Document : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली आहेत...अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं सापडली आहेत...आज सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणारे...त्यावेळी त्यांना ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिलीये....पूजा खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते...जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिले होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा 

15 Jul 2024, 13:24 वाजता

'आरक्षणासंदर्भात पवारांशी चर्चा केली', छगन भुजबळ यांची माहिती

 

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली...ही भेट राजकीय नसून, राज्यात आरक्षणावरून स्फोटक स्थिती निर्माण झालीय...ती शांत करण्यासाठी पवारांची भेट घेतल्याची माहिती भुजबळांनी दिली...पवार हे ज्येष्ठ नेते आहेत...त्यामुळे राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती भुजबळांनी केलीय...यावेळी पवारांनी शिंदेंशी चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं...