Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

22 Jul 2024, 20:46 वाजता

बहिणींनो आता विधानसभेला लक्षात ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल- अजित पवार

 

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : बहिणींनो आता विधानसभेला लक्षात ठेवा, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल असं महत्त्वाचं विधान अजित पवारांनी पारनेरमध्ये केलंय.. अजितदादांचा वादा आहे ही योजना बंद पडू देणार नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल असं आवाहनही अजित पवारांनी केलंय. तसंच मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण तर शेतकर्‍यांना मोफत वीज देण्याचं आश्वासनही अजित पवारांनी दिलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

22 Jul 2024, 18:14 वाजता

मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाचा लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ

 

CM Shinde accepted Jaranges demand : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंची मागणी मान्य केलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.. 2024-2025 या वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे.. अर्ज केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलीय.. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय.

 

22 Jul 2024, 16:41 वाजता

मनोरमा खेडकर यांना न्यायालयीन कोठडी, जामीन अर्ज दाखल

 

Manorama Khedkar Update : मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.. शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकवल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी. मनोरमा खेडकर यांची रवानगी आता येरवडा जेलमध्ये होणार. न्यायालयीन कोठडी मिळताच मनोरामा खेडकर यांनी जामीन अर्ज केला दाखल. 

22 Jul 2024, 16:07 वाजता

मराठा-ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा- सूत्र

 

Sharad Pawar - CM Shinde Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमधील बैठक संपली.. सह्याद्री अतिथीगृहावर पवार-शिंदेंमध्ये तासभर चर्चा.. विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. येत्या काही दिवसांत पुन्हा सर्वपक्षीय बैठक होणार. विरोधकांनाही निमंत्रण देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
जातीय सलोखा कायम ठेवण्यासठी आगामी सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांचा हिरवा कंदिल मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
सर्व विषयांवरील चर्चा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार या दोघांमध्येच मराठा-ओबीसी वादावर बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

22 Jul 2024, 14:15 वाजता

कावड यात्रेत नेमप्लेट लावण्याच्या निर्णयास स्थगिती

 

Kavad Yatra : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिलाय. कावड यात्रेतील मार्गावर असलेल्या दुकानांवरील नेमप्लेटसंदर्भात सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, योगी सरकारनं खाद्यपदार्थ आणि दुकानदारांच्या नावासंदर्भातील निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिलीय. या निर्णयाला राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनीही कडाडून विरोध केला होता. सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला नोटीसही जारी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 14:06 वाजता

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा - वर्षा गायकवाड

 

Delhi Varsha Gaikwad : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केलीय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा तिढा अजूनही कायम आहे. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. मराठी भाषा प्राचीन असून तिचे वय 2 हजार वर्षांपूर्वीच आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, असं त्यांनी म्हटलंय.

22 Jul 2024, 13:47 वाजता

नागपूरकरांची पावसामुळं उडाली दैना

 

Nagpur Rain : नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. महापालिका प्रशासनाचा निष्क्रिय कारभार, नालेसफाई आणि पावसाळ्याच्या तयारीचा अभाव यामुळे शहरात अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होतं... अनेक ठिकाणी घरात पाणी शिरलं. दरम्यान इथल्या नागरिकांनी महापालिकेच्या कारभाराबाबत आणि सिमेंटच्या रस्त्यांची उंची वाढवल्याबाबत रोष व्यक्त केलाय. याबाबत आता लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 13:41 वाजता

देवेंद्र फडणवीसांची ईडी चौकशी लावा - संजय राऊत

 

Sanjay Raut On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊतांनी केलीय...विधान परिषद निवडणुकीत मविआचे 20 आमदार फोडले असे फडणवीस म्हणतात, त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शाहांनी चौकशी करावी असं राऊतांनी म्हटलंय...कालच फडणवीसांनी मविआचा फुगा फुटला असून, विधान परिषद निवडणुकीत त्यांचे 20 आमदार कधी फुटले ते कळलं नाही असं विधान केलं होतं...त्यावर राऊतांनी पलटवार केलाय...

22 Jul 2024, 12:41 वाजता

मुख्यमंत्रिपदावर शिंदेंचाच दावा असेल - नरेश म्हस्के

 

Delhi Naresh Mhaske : महायुतीत पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढवल्या जातील आणि पुढील 15 वर्षे शिंदेच नेतृत्त्व करतील असा दावा खासदार नरेश म्हस्केंनी केलाय...मुख्यमंत्रीही शिंदेंच असतील असं मोठं विधान नरेश म्हस्केंनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -

22 Jul 2024, 12:23 वाजता

पिंपरीत कारची पादचारी महिलेला धडक

 

Pimpri Hit And Run : पिंपरी-चिंचवडमध्ये हिट अँड रनच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीय. पिंपरी गावात कारनं पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही समोर आलंय.रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडलीय. कार चालकानं जाणीवपूर्वक महिलेला धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. महिलेला धडक देऊन कार चालक फरार झालाय. अज्ञात कार चालकाला विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरूय.

बातमीचा व्हिडीओ पाहा  -