Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

22 Jul 2024, 12:12 वाजता

मुलुंडमध्ये हिट अँड रन

 

Mulund Hit And Run : मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आलीय...ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलीय...दोन रिक्षांना धडक देऊन ऑडी कार चालक फरार झालाय...यात रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेयत...रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे...अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय...मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा 

22 Jul 2024, 12:09 वाजता

आरक्षण OBCतून द्यायची की नाही सांगा?- मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

 

Manoj Jarange : ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे तुम्ही सांगा...असा सवाल मनोज जरांगेंनी फडणवीसांना विचारलाय...आरक्षण द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू...आरक्षण नाही दिलं तर आम्हाला सरकार बनवावं लागेल असा इशाराही जरांगेंनी दिलाय...कालच फडणवीसांनी आरक्षणाबाबत मविआने भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं होतं...त्यावर जरांगेंनी उत्तर दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 11:49 वाजता

Ajit Pawar Camp On Kavad Yatra : कावड यात्रेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं काढलेल्या आदेशाला एनडीए आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विरोध केलाय. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या बैठकीमध्ये पक्षानं या आदेशाला विरोध केलाय. अजित पवार यांच्यासोबत चिराग पासवान आणि जयंत चौधरी या मित्र पक्षांनीही या आदेशाला विरोध केलाय. आज संसदेमध्ये या प्रश्नावरुन गोंधळ होण्याची शक्यताय. त्यामुळे विरोधकांसोबत मित्र पक्षाच्या विरोधामुळे संसदेत सरकारची कोंडी होण्याची शक्यताय. यात्रेच्या मार्गावर असणा-या हॉटेल आणि दुकानदारांनी त्यांची नावे ठळकपणे लिहावीत असा आदेश उत्तर प्रदेश सरकारनं काढलाय. यामुळे मुस्लिम आणि हिंदू धर्मातील काही जातीच्या हॉटेलमध्ये भाविक जाणार नाही अशी भिती व्यक्त केली जातेय. त्यामुळे या निर्णयाला विरोध होतोय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 11:25 वाजता

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

 

Sanjay Raut On Devendra Fadanvis : फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल चढवलाय...ठोकून काढा म्हणजे काय...? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत....गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा...आणि दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय...कालच फडणवीसांना कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना विरोधकांना उत्तर देताना आदेशाची वाट पाहू नका...मैदानात उतरून ठोकून काढा असा आदेश दिला...त्यावरून राऊतांनी समाचार घेतलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 09:55 वाजता

बांग्लादेशातील हिंसेचा व्यावसायिकांना फटका

 

Bangladesh Protest Update : बांग्लादेशातील हिंसेचा भारतीय व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. बांग्लादेशात उसळलेल्या दंगलीमुळे संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आलाय. समुद्रीमार्ग आणि सर्व रस्ते बंद करण्यात आलेत. यामुळे भारतीय व्यापा-यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. दोन्ही बाजूने माल वाहतूक बंद करण्यात आली. माल वाहून नेणारे शेकडो ट्रक सीमेवर अडकून पडलेत. यामुळे व्यापार ठप्प झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 09:48 वाजता

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

 

Central Railway : सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय...यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय...आज आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने सकाळीच कामावर जाणा-यांचे हाल झालेयत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 08:51 वाजता

पावसाची दडी, मराठवाड्याची चिंता वाढली

 

Sambhajinagar Jaikwadi Dam : मराठवाड्याची तहान भागविणा-या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघा 4.13 टक्क्यांवर आलाय.यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आलेत तरीही चांगला पाऊस धरण क्षेत्रात आणि वरील भागात देखील झालेला नाही. त्यामुळे परिसरात पडणा-या पावसामुळे सध्या 196 क्युसेकनं आवक आहे. मात्र पाणीसाठ्यात वाढ होत नाही. तो पाणीसाठा केवळ 2 महिने पिण्यासाठी पुरेल एवढाच असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 08:46 वाजता

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस

 

Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जालन्यात अंतरवाली सराटीत त्यांचं उपोषण सुरूये. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि इतर मागण्यांसाठी जरांगेंनी उपोषण सुरू केलंय. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असल्यानं त्यांची प्रकृती खालावत चाललीये. काल तीन वेळा डॉक्टरांनी जरांगेंची तपासणी केली. दरम्यान आतापर्यंत राज्य सरकारनं मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या पूर्ण केल्यात, असा जरांगेंनी जाब विचारत अंतरवालीत येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 08:00 वाजता

नागपुरात अतिवृष्टीमुळं 3 जणांचा बळी

 

Nagpur : नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. शनिवारी नागपूरमध्ये अतिवृष्टी झाली. त्यादरम्यान भरतवाडा, पूनापूर आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या घटना घडल्या. श्यामनगर पुनापूर भागातील भोजराज पटेल नावाची व्यक्ती नाल्याच्या बाजूने उभे होते. त्यांचा अचानक पाय घसरला आणि ते पाण्याच्या प्रवाहाने वाहत गेले. भरतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनबाबा नगर परिसरात श्रावण तुलसीकर हा 12 वर्षाचा मुलगा नाल्याच्या बाजूने खेळत असतांना वाहत गेला. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.तर बेलतरोडी ते बेसा जवळ  पूर पाहण्यासाठी गेलेली महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

22 Jul 2024, 07:44 वाजता

मोबाईल टॉवर कोसळून 3 घरांचं नुकसान

 

Bhandup Mobile Tower Collapse : मुंबईतील भांडुपच्या रमाबाईनगरात मोबाईल टॉवर घरांवर कोसळल्याने 3 घरांचं नुकसान झालंय...मुसळधार पावसामुळे काल मोबाईल टॉवर कोसळला...मोबाईल टॉवर कोसळून घरांचं प्रचंड नुकसान झालंय...या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही...