Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना अजितदादांचा वादा

22 Jul 2024, 07:23 वाजता

जो बायडेन यांची निवडणुकीतून माघार

 

Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती डेमोक्रॅटीक पक्षाचे नेते आणि समर्थक करत होते. अखेर बायडेन यांनी माघार घेतली. अमेरिका आणि पक्षाच्या हितासाठी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलंय. आता डेमोक्रॅटीक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू आहे. यात कमला हॅरिस यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचं बोललं जातंय.

22 Jul 2024, 07:19 वाजता

सांगलीला पुराचा धोका

 

Sangli Heavy Rain : मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. वारणा, मोरणा नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. त्यामुळे वारणा नदीवरील मांगले-काखे, ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेलेत. त्यानंतर याठिकाणची वाहतूक ठप्प झालीय. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना शिराळा तहसील प्रशासनाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.  जनावरांनाही स्थलांतर करण्याच्या सूचना गावात दवंडी देऊन देण्यात आल्यात.

22 Jul 2024, 07:11 वाजता

कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाचा जोर

 

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरादर पाऊस सुरुय. त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय. तर पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरुय. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 38 फूट 7 इंचावर पोहचलीय. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे. नदीची पाणी पातळी वाढत चालल्यानं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्यायत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन टीम, NDRF यांना देखील अलर्ट मोडवर ठेवलंय. जिल्हयातील 86 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक रस्त्यावर आता पाणी यायला सुरूवात झालीय.

22 Jul 2024, 07:09 वाजता

रायगडमध्ये शाळा आणि कॉलेजला सुट्टी

 

Raigad School & College : रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यात आज शाळांना सुट्टी देण्यात आलीय. महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जत तालुक्यात आज शाळा, कॉलेजेस बंद असतील. रायगड जिल्ह्यात हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी सुट्टी जाहीर केलीय.

22 Jul 2024, 07:08 वाजता

नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत शाळा आणि कॉलेजला सुट्टी

 

Nagpur, Chandrapur, Gadchiroli School Close : विदर्भातील 3 जिल्ह्यात आज शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलीय...नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत आज शाळा-कॉलेजला सुट्टी दिलीय...अतिवृष्टीच्या इशा-यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलीय...चंद्रपुरात शाळा-कॉलेज, अंगणवाड्या आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिलेयत...तर गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा आणि महामार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग बंद असल्याची स्थिती बघता जिल्ह्यात सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टीची घोषणा करण्यात आलीय...