Uric Acid Home Remedy in Marathi : बदलेली जीवनशैली, बाहेरच्या खाण्यावर भर आणि कामाचा ताण यामुळे अनेकांना युरिक अॅसिडची समस्या दिसून येत आहे. तासंतास एकाच जागेवर बसून काम करणे, व्यायामाचा अभाव यामुळे सांधेदुखीने अनेक जण त्रस्त आहेत. सांधेदुखी समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसून येत आहे. त्यामुळे शरीरातील वाढत्या युरिक अॅसिडवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदात उपाय सांगितला आहे. तुम्ही दररोज हिरवी चटणी करुन खाल्ल्यास या घरगुती उपायाने युरिक अॅसिडच्या समस्येवर तुम्ही मात करु शकता. (Uric Acid Remedy)
जर तुम्ही युरिक अॅसिडने त्रस्त असाल तर या आयुर्वेदिक चटणीचा आहारात समावेश करा असं सांगण्यात आलंय. ही चटणी रोज खाल्ल्याने शरीरात साचलेली प्युरिन निघून जाईल आणि तुम्हाला अनेक गंभीर आजारांपासून आराम मिळतो असं म्हटलं जातं.
या चटणीसाठी हिरवी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घेऊन स्वच्छ करून घ्या आणि नंतर ही पाने मिक्सरमध्ये टाका आणि सोबत लसणाच्या 3-4 पाकळ्या टाका. चवीनुसार थोडे आले, लिंबाचा रस, जिरे आणि खडे मीठ घाला. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. ही चटणी सकाळी आणि संध्याकाळी जेवणासोबत किंवा कोणत्याही नाश्त्यासोबत खा. याचे सेवन केल्याने काही दिवसातच युरिक अॅसिड नियंत्रणात येतं आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
प्रत्येकाच्या शरीरात युरिक अॅसिड असतं आणि ते सहसा लघवीसोबत शरीरातून बाहेर पडतं. मात्र कधीकधी शरीरात प्युरीनचे प्रमाण वाढू लागतं आणि ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात शरीराच्या सांध्यामध्ये जमा होते. अशा स्थितीत सांध्याच्या भागात वेदना आणि सूज येण्यास सुरुवात होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, युरिक वेदना ही बोटे, घोटे, टाच आणि सांधे यांमध्ये सर्वात तीव्र असते आणि जेव्हा शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त झाल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)