टीम इंडियात फूट? हार्दिक-शमीचा 'तो' धक्कादायक Video चर्चेत; चाहते टेन्शनमध्ये

Split In Team India Hardik Pandya Mohammed Shami Video: विराट, रोहित आणि रविंद्र जडेजासारखे वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे वरिष्ठ म्हणून पाहिलं जात त्याचं दोन खेळाडूंचा हा व्हिडीओ चर्चेत

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 30, 2024, 10:29 AM IST
टीम इंडियात फूट? हार्दिक-शमीचा 'तो' धक्कादायक Video चर्चेत; चाहते टेन्शनमध्ये title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

Split In Team India Hardik Pandya Mohammed Shami Video: भारतीय क्रिकेट संघात फुट पडलीये की काय अशी भीती क्रिकेट चाहत्यांना वाटू लागली आहे. यामागील कारण म्हणजे बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकदामीच्या उद्घाटन समारंभातील व्हायरल झालेला एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दिसत आहेत. मात्र या दोघांचं एकमेकांबद्दलचं वागणं अनेकांना खटकलं असून हा व्हिडीओ समोर आल्यापासून उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे आणि या चर्चा का सुरु आहेत पाहूयात...

नेमकं घडलं काय?

बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएच्या उद्घाटनानिमित्त हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. या सोहळ्यातील अनेक मान्यवर मैदानावर येऊन खेळपट्टी आणि सुविधांची पहाणी करत असताना दिसत आहेत. यावेळी हार्दिक एका गटाबरोबर आणि शमी अन्य काही मान्यवरांबरोबर उभे असल्याचं दिसत आहे. हे दोघे क्षणभरासाठी एकमेकांकडे पाहतात मात्र दोघे एकमेकांना ओळखही दाखवत नसल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर वाटतं. शमी आणि हार्दिक एकमेकांना पाहूनही दुर्लक्ष केल्याप्रमाणे वागताना दिसत आहे. दोघांनी एकमेकांना जाणूनबुजून दुर्लक्षित केलं की दोघांनीही एकमेकांना नोटीस केलं नाही याबद्दल चाहत्यांची मतमतांतरे आहेत. 

त्या वादामुळे कटुता?

खरं तर हार्दिक आणि शमी दोघेही इंडियन प्रिमिअर लीगच्या स्पर्धेमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाकडून खेळले आङेत. हार्दिकने 2024 च्या आयपीएलपूर्वी गुजरातची साथ सोडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात प्रवेश करत थेट कर्णधारपद भूषवलं. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये शमीने हार्दिक पंड्या त्याच्या फिल्डींगवर नाराज होऊन मैदानातच त्याला अपशब्द बोलल्याचा किस्सा सांगितला होता. शमीने यावेळेस बोलताना अगदी स्पष्टपणे हार्दिकचं सार्वजनिक ठिकाणी हे असं वागणं पटलं नसल्याचं सांगितलं होतं. तसेच शमीने आपण त्याचवेळी त्याला असं सार्वजनिक ठिकाणी बोलू नकोस असं सांगितल्याचंही म्हटलेलं.

आता या दोघांकडे आदर्श म्हणून पाहिलं जात असताना...

आता याच वादाची कटूता हार्दिक आणि शमी या दोघांमध्ये आहे की इतर काही कारणांनी या दोघांनी एकमेकांना भेटणं टाळलं हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र आता विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यासारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये वरिष्ठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे त्यापैकी दोघांनी म्हणजेच हार्दिक आणि शमीने हे असं वागणं भारतीय संघाच्या एकजुटीच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याचं चाहत्याचं म्हणणं असून व्हिडीओ धक्कादायक असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. एनसीएमधील दोघांतील हा न झालेला संवाद आणि एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडीओ तुम्हीच पाहा...

हार्दिक पुन्हा मैदानात

हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्ध 6 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालं आहे. तर दुसरीकडे शमी हा शस्त्रक्रीयेमधून आताच बरा झाला असून तो अजून मैदानावर परतण्यासाठी सराव करत आहे.