Maharashtra Breaking News LIVE : अहमदनगरचं नाव आता 'अहिल्यानगर', केंद्र सरकारकडून मंजुरी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : अहमदनगरचं नाव आता 'अहिल्यानगर', केंद्र सरकारकडून मंजुरी

4 Oct 2024, 22:15 वाजता

'महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्कस करून ठेवली', राज ठाकरेंचा नरहरी झिरवाळांना टोला

 

Raj Thackeray : मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारत आमदार आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आंदोलन केलं, त्यावर राज ठाकरेंनी ट्वीट करत टीका केलीये....आदिवासी समाजावर होणा-या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारून म्हणे यांनी निषेध नोंदवला. हा कुठला निषेध? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय...सत्तेशिवाय राहु शकत नाही असं म्हणणं शक्य नव्हतं, म्हणून जनतेच्या सेवेला सत्ता हवी, म्हणत तुम्हीच आणि तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्यात ना? 
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

4 Oct 2024, 21:41 वाजता

माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा मृत्यू

 

Salil Ankola mother Death : माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा संशयास्पद मृत्यू झालाय...पुण्यातील प्रभात रोड परिसरात राहत्या घरात माला अंकोला यांचा मृतदेह आढळून आला...प्रथमदर्शनी त्यांच्या गळ्यावर जखम असल्याचं पोलिसांनी सांगितलं...हत्या की आत्महत्या याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

4 Oct 2024, 21:10 वाजता

7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार

 

Harshwadrdhan Patil : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे. आता हर्षवर्धन पाटील 7 ऑक्टोबरला माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे,खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, आमदार रोहित पवार,राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार यांसह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. 

4 Oct 2024, 20:24 वाजता

राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स

 

Rahul Gandhi : पुणे कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलं आहे. 23 ऑक्टोबर रोजी कोर्टात हजर राहण्याचं समन्स कोर्टानं बजावलंय. सत्यकी अशोक सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना, कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी, त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा पुणे कोर्टात दाखल करण्यात आलाय. 

4 Oct 2024, 19:05 वाजता

अहमदनगरचं नाव आता 'अहिल्यानगर', केंद्र सरकारकडून मंजुरी 

 

Ahilyanagar : अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीये. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर नावाने ओळखला जाणार आहे.

4 Oct 2024, 18:52 वाजता

राज्यातील 5 विभागांत काँग्रेसचं समन्वयक

 

Congress : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसकडून महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत...राज्यातील पाच विभागात समन्वयक नेमण्यात आलेत...मुंबईसाठी चायनिका उनियाल, संभाजीनगरसाठी शमा मोहम्मद, पुण्यासाठी महिमा सिंग, नागपूरसाठी हर्षद शर्मा आणि नाशिकसाठी सुभ्रांशु कुमार राय यांची निवड करण्यात आलीये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

4 Oct 2024, 18:01 वाजता

राज्याच्या ग्रामीण जनतेला दिलासा, एनए टॅक्स पूर्णपणे माफ

 

NA  Tax : राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा...राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ... शेतजमीन एनए (नॉन एग्रीकल्चर) करण्यासाठीचा कर पूर्णपणे माफ...राज्य मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर....शेतजमीनीवर घर किंवा व्यावसायिक इमारती बांधण्यासाठी सरकारला अकृषिक कर द्यावा लागत असे 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

4 Oct 2024, 17:35 वाजता

राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द

 

Rahul Gandhi : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा 1 दिवसानं पुढे ढकलण्यात आला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं  राहुल यांचा दौरा 1 दिवसानं पुढे ढकलला गेलाय. त्यामुळे राहुल गांधी उद्या सकाळी 8.30 वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत. 

4 Oct 2024, 17:07 वाजता

पंतप्रधान मोदी उद्या वाशिम दौऱ्यावर

 

PM Narendra Modi Washim Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाशिम दौ-यावर असणार आहेत. पंतप्रधान उद्या सकाळी 10 वाजता विशष हेलिकॉप्टरन पोहरादेवीला पोहोचणारेत. त्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील.त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

4 Oct 2024, 16:37 वाजता

'40 आमदार आले त्याची चर्चा नाही',रावसाहेब दानवेंचं वक्तव्य

 

Raosaheb Danve on Harshavardhan Patil : हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. एक-दोन आमदार पक्ष सोडून गेले तर त्याची चर्चा होते. मात्र, विरोधी पक्षातील 40 आमदार आले त्याची चर्चा होत नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली. यावरून भाजप नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत नाही, असं दिसतंय, असे दानवे म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-