Maharashtra Breaking News LIVE : अहमदनगरचं नाव आता 'अहिल्यानगर', केंद्र सरकारकडून मंजुरी

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 04 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : अहमदनगरचं नाव आता 'अहिल्यानगर', केंद्र सरकारकडून मंजुरी

4 Oct 2024, 10:23 वाजता

राज ठाकरेंचा शनिवारी संभाजीनगरचा दौरा

 

Sambhajinagar Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  यावेळी ते मराठवाड्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणारेत. ..प्रत्येक जिल्ह्यातून 25 प्रमुख कार्यकर्त्यांना या बैठकांसाठी बोलवण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी मनसेच्या निरीक्षकांनी मराठवाड्याचा दौरा केला होत्या त्या सर्व निरीक्षकांनाही याबैठकीसाठी बोलवण्यात येणारेय..  मनसे मराठवाड्यात किती जागा लढवणार याबाबतचा निर्णय सुद्धा शनिवारी होणारेय.. राज ठाकरे सकाळी संभाजीनगरमध्ये दाखल होणार  आणि त्यानंतर दिवसभर आढावा बैठक  होणारेय.  त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे नाशिककडे रवाना होणारेत...

4 Oct 2024, 10:11 वाजता

पुण्यात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना

 

Pune Rape : पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना घडली...बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन तरुणांनी अत्याचार केले. मित्रासोबत फोटो काढत असताना तिथे तीन तरुण आले. त्यांना धमकवत तरुणीला कारमध्ये बसवत येवले वाडी भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचं उघड झालं. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपीच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 10 पथकं रवाना केलीत....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 10:09 वाजता

फक्त मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली-राऊत

 

Sanjay Raut : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद आहे मात्र केवळ माराठी भाषेलाच नको तर मराठी माणसालाही प्रतिष्ठा  देण्याची गरज असल्याचं राऊत म्हणालेत.. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन गद्दारीचा कलंक पुसता येणार नाही असा टोलाही त्यांनी सरकारला  लगावलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 10:07 वाजता

अजित पवारांचे बारामतीतून माघार घेण्याचे संकेत

 

Baramati Ajit Pawar : अजित पवारांनी बारामतीतून माघार घेणार असल्याचे संकेत दिलेत. जो उमेदवार देईन त्याला निवडणून आणा, असं जाहीर आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय. त्यांच्या या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णयानंतर स्पष्ट करणार, अशा अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 09:01 वाजता

आंबेगावमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

 

Ambegaon School : बदलापूर घटनेनंतर आता आंबेगाव तालुक्यातील एका शाळेत धक्कादायक घटना घडलीय. क्रीडा शिक्षकानेच खेळाडु विद्यार्थींचा विनयभंग केल्याचं उघड झालंय. याप्रकरणी क्रीडा शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्यापही आरोपीला अटक झालेली नाही. याआधीही या संस्थेत असे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आलेत. विशेष म्हणजे इथे असणारा सीसीटीव्ही जाणीवपूर्वक हलवून दुष्कृत्य घडत असल्याचं समोर आलंय.पिडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन घोडेगाव पोलीसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विद्यार्थीनींना कँप्टन पद देण्याचं आमिष दाखवत जवळीक साधुन शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 08:47 वाजता

नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर

 

Sangli Nitin Gadkari & Sharad Pawar : सांगलीमध्ये आज शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच मंचावर येणार आहेत. शहरात आज मराठा समाज संस्थेचा एक कार्यक्रम पार पडणारेय. या कार्यक्रमाला पवार आणि गडकरी हे दोन्ही नेते उपस्थित राहणारेत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते एकामागून एक शरद पवारांच्या पक्षात दाखल होत आहेत. पवारांनी सांगलीत भाजपाला धक्का देत भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुखांना आपल्या पक्षात दाखल करून घेतलं. एकीकडे भाजपाला खिंडार पाडत असताना नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर असल्यानं सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमाकडं लागून आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 08:43 वाजता

मनोज जरांगेंचं पैठण फाटा इथं नवं ऑफिस

 

Manoj Jarange New Office : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी इथला पत्ता बदलून तो लवकरच शहागड इथला पैठण फाटा असा होणार आहे. पैठण फाट्यावर मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांच्यासाठी जनसंपर्क कार्यालय तयार करण्यात आलंय. जरांगे यांच्या या जनसंपर्क कार्यालयाचं आज उदघाटन होणारेय. गेल्या 13 महिन्यांपासून जरांगे अंतरवाली सराटीतून मराठा आंदोलन चालवतायत. आता जरांगे लवकरच त्यांच्या नवीन कार्यालयातुन कामकाज सुरू करण्याची शक्यताय. छत्रपती भवन' असं जरांगे यांच्या नवीन कार्यालयाला नाव देण्यात आलंय..या कार्यालयात जरांगे यांच्यासाठी अँटी चेंबर,वेटिंग हॉल,राज्यभरातुन जरांगेंच्या भेटीला येणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी अत्यावश्यक सुविधा आणि मुक्कामाची व्यवस्था,सीसीटीव्ही कॅमेरे अशा अनेक सुविधा तयार करण्यात आल्यात.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 08:17 वाजता

राहुल गांधींचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा

 

Kolhapur Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे तब्बल 14 वर्षानंतर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणारेत. आज आणि उद्या दोन दिवस राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. या दौऱ्यामध्ये कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण राहुल गांधींच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला देखील राहुल गांधी भेट देणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा पश्चिम महाराष्ट्रातील हा दुसरा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 07:55 वाजता

संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात

 

Sanjay Rathod : यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. रात्री दोन वाजता दिग्रस जवळील कोपरा गावाजवळ पालकमंत्री राठोड यांच्या वाहनाने केळी घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप वाहन उलटली. यात पिकअप व्हॅनचा चालक जखमी झाला तर मंत्री संजय राठोड आणि त्यांचा वाहनचालक सुदैवाने बचावले  अपघातात राठोडांच्या गाडीचा समोरचा भाग चक्काचुर झाला. गाडीतील एअरबॅग उघडल्याने त्यांना कुठलीही ईजा झाली नसल्याची माहिती आहे. संजय राठोड पोहरादेवी इथे पंतप्रधानांच्या  आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेऊन यवतमाळ कडे परतत असताना हा अपघात झाला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

4 Oct 2024, 07:45 वाजता

हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार?

 

Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते भूमिका जाहीर करतील. पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करावा, असा आग्रह कार्यकर्ते करत आहेत. दरम्यान हर्षवर्धन पाटलांनी काल सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेऊन 1 तास चर्चा केल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत.. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरूये..

बातमीचा व्हिडीओ पाहा -