Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Oct 2024, 21:01 वाजता

राज ठाकरेंकडून राजू पाटील आणि अविनाश जाधवांना उमेदवारी

 

Maharashtra Election 2024 :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणारे...मात्र त्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधवांची उमेदवारी जाहीर केलीये...24 ऑक्टोबरला राजू पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

21 Oct 2024, 18:30 वाजता

नांदेडमध्ये महायुतीत बंडखोरी, बालाजी खतगावकर अपक्ष निवडणूक लढवणार

 

Maharashtra Election 2024 : नांदेडमध्ये महायुतीत बंडखोरी.. एकनाथ शिंदेंचे खासगी स्वीय सचिव बालाजी खतगावकर अपक्ष निवडणूक लढवणार.. मुखेड मतदार संघातून भाजपनं तुषार राठोडांना उमेदवारी दिल्याने खतगावकरांची बंडखोरी.. खासगी सचिव पदाचा राजीनामा देत, अपक्ष निवडणूक लढवण्याची खतगावकरांची घोषणा.

 

21 Oct 2024, 17:03 वाजता

परिवर्तन महाशक्ती उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 

Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणात उतरली आहे.. परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. यामधील पहिली 8 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आलीये..परिवर्तनच्या पहिल्या यादीत अचलपूर मतदारसंघातून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना तर स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चपट यांना राजुरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.. सोबतच संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांना ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीये.. तर शिरोळ आणि मिरज या जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या.. राजू शेट्टी हे कार्यकर्त्याशी चर्चा करुन या दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर करणार आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

21 Oct 2024, 16:21 वाजता

...म्हणजे औरंगजेब, अफझल खानाशी हातमिळवणी - संजय राऊत

 

Maharashtra Election 2024 : अमित शाहांसोबतच्या भेटीच्या चर्चांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांकडून पूर्णविराम...यांच्याशी हातमिळवणी करणं औरंगजेब आणि अफजल खानाशी हात मिळवणी करणं फेटाळल्या भेटीच्या चर्चा...महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीच जाणार नाही...संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं.

 

21 Oct 2024, 14:29 वाजता

2 दिवसांत विधानसभा जागांवर निर्णय घेणार  - मनोज जरांगे

 

Manoj Jarange : येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार, कुठल्या जागा पाडणार याबाबत निर्णय घेऊ, असं जरांगे पाटलांनी सांगितलंय. आचारसंहितेपूर्वी सरकारला संधी दिली होती. मात्र त्यांनी संधीचं सोन केलं नाही, आता युद्ध अटळ आहे, अशा थेट इशारा जरांगेंनी दिलाय. 

बातमी पाहा - आता, लढणार , पाडणार , जिरवणार, युद्ध अटळ... मनोज जरांगेंनी सांगितलं कोणत्या जागा लढवणार

21 Oct 2024, 14:01 वाजता

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं - यशोमती ठाकूर

 

Yashomati Thakur : अमरावतीतील महाविकास आघाडीच्या युवक मेळाव्यात  काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान केलंय.... उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हाव ,असं विधान यावेळी  यशोमती ठाकूर यांनी केलं..  त्यामुळे पुन्हा एकदा उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहे.. तसेच  राजकीय वर्तुळात ही या चर्चांना उधाण आलंय.. तर यशोमती ठाकूर यांच्या  या विधानावर मविआमधून  काय प्रतिक्रिया समोर येतील याकडे सर्वांचे लक्ष लागलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 13:34 वाजता

एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार

 

Maharashtra Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते उमेदावारी अर्ज दाखल करणार आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 12:51 वाजता

प्रियंका गांधी, राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचाराला येणार - राहुल गांधी

 

Maharashtra Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराचा जोरदार धुरळा उडणारेय. काँग्रेसनं प्रचाराची तयारी सुरू केलीय. काँग्रेस नेते प्रियंका गांधी, राहुल गांधी हे महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथलांनी दिलीय. दिल्लीतीन नेते प्रचारासाठी येणार असल्याचं चेन्नीथलांनी म्हटलंय. 

21 Oct 2024, 12:04 वाजता

भाजपच्या आणखी 2 याद्या जाहीर होणार - बावनकुळे

 

Maharashtra Election 2024 : भाजपच्या आणखी 2 याद्या जाहीर होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय. दुसरी आणि तिसरी यादी जाहीर होणार असल्याचं ते म्हणालेत. महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनुसार यादी पूर्ण होत आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.

21 Oct 2024, 11:44 वाजता

माऊली कटकेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

 

Maharashtra Election 2024 : शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीला मोठा धक्का... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष इच्छुक उमेदवार माऊली कटके यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश.... प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे अजित पवार यांच्या उपस्थितीत माऊली कटके यांनी केला मुंबई येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश...शिरूर लोकसभेत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का... माऊली कटके यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता..