Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on October 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Oct 2024, 11:08 वाजता

नाशिकमध्ये काँग्रेसचं अस्तित्व शून्य?

 

Maharashtra Election 2024 : लोकसभेला राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारी काँग्रेस नाशिकमध्ये शून्यावर आल्याचं दिसतंय. जिल्ह्यातील एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत काँग्रेसला रामराम केलाय.1962 मध्ये नाशिक जिल्ह्यातील बारा जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. 1985 पर्यंतही वर्चस्व कायम होतं मात्र त्यानंतर सुरू झालेली पडझड आज शून्य वर पोहोचली आहे.  त्यामुळे नाशिकमध्ये काँग्रेसला आपलं अस्तित्व राखण्याचं मोठं आव्हान आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 10:47 वाजता

दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार

 

Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटील यांचं ठरलं असून आंबेगाव विधानसभेतून दिलीप वळसे पाटील 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. त्याच दिवशी प्रचाराचा श्रीगणेशा करणार असल्याची महितीही त्यांनी दिलीये.

21 Oct 2024, 10:14 वाजता

CNGच्या किमती वाढण्याची शक्यता

 

CNG Price May Hike : ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.. कारण CNGच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.. CNGच्या किंमती 4 ते 6 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकारकडून देशभरातील किरकोळ विक्रेत्यांना घरगुती नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. या सर्व विक्रेत्यांच्या नैसर्गिक वायू पुरवठा २० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुरवठ्यावर ताण पडल्याने भविष्यात सीएनजीच्या दरात वाढ करावी लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे दरवाढ रोखण्यासाठी राज्य सरकार सीएनजीवरील उत्पादन शुल्कात कपात करु शकते.. मात्र तसं न झाल्यास ऐन दिवाळीत सर्वसामान्यांचे खिसे रिकामे होण्याची शक्यता आहे.

21 Oct 2024, 09:09 वाजता

सोलापूर शहर मध्यवर माकपचा दावा

 

Maharashtra Election 2024 : सोलापुरात महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सोलापूर शहर मध्यवर माकपनं दावा ठोकलाय. या जागेवर माजी आमदार नरसय्या आडम हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. 28 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. उमेदवारी मिळावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडं विनंती केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

21 Oct 2024, 09:05 वाजता

अजित पवार बारामतीतून 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार

 

Baramati Ajit Pawar : उपमुख्यमत्री अजित पवार बारामतीतून लढणार असल्याचं स्पष्ट झालंय.सोमवारी 28 ऑक्टोबरला विधानसभेचा उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 08:47 वाजता

शिवसेना आणि राष्ट्रवादीची पहिली यादी आज जाहीर होणार?

 

Maharashtra Election 2024 : भाजपनं कालच आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीये. त्याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे मित्रपक्षंही आज आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि  राष्ट्रवादी आज आपली पहिली यादी जाहीर करू शकतंय. काल रात्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत यादी जाहीर करण्यासंदर्भात चर्चा झालीये. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 08:30 वाजता

नागपुरात काँग्रेसची नवी रणनीती?

 

Maharashtra Election 2024 : नागपूर जिल्ह्यात काँग्रेसनं नवी रणनिती आखलीये.. नागपूर जिल्ह्यातील 6 पैकी 3 मतदारसंघात काँग्रेस महिला उमेदवार देण्याची शक्यता आहे.. खास करून ग्रामीण भागात काँग्रेसचा नेतृत्व करणा-या सुनील केदारांनी त्यांच्या अनेक महिला कार्यकर्त्यांना यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केलीये.. कामठी मतदारसंघातून अवंतिका लेकुरवाळे, हिंगणा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास कुंदा राऊत आणि उमरेड किंवा इतर एका मतदारसंघातून रश्मी बर्वे या उमेदवार असू शकतील अशी चर्चा आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 08:14 वाजता

राज पुरोहित मविआत जाणार?

 

Raj Purohit : विधानसभेची यादी जाहीर होताच भाजपात पहिली बंडखोरी होण्याची शक्यताय. माजी मंत्री राज पुरोहित महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. कुलाब्यातून उमेदवारीसाठी पुरोहित यांनी भाजप नेतृत्वाकडे मागणी केली होती.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Oct 2024, 07:44 वाजता

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत..  19 आणि 20 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान आहे.. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं मतदान गावी आहे.. त्यामुळे मतदानसाठी गावी जाऊन परीक्षेला येणं विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी युवासेनेनं विद्यापीठाकडे केलीय..