31 Oct 2024, 09:15 वाजता
मनोज जरांगेंची दलित, मुस्लीम धर्मगुरूंसोबत आज बैठक
Manoj Jarange : मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीत दलित आणि मुस्लीम समाजाच्या धर्मगुरूंची बैठक घेणार आहेत.या बैठकीत निवडणुकीसाठी मराठा,मुस्लीम आणि दलितांचं समीकरण जुळतं की नाही याबाबत चाचपणी केली जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता बैठकीला सुरूवात होणार आहे.. अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे.
31 Oct 2024, 08:57 वाजता
संभाजीनगरात भेसळयुक्त खवा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा
Sambhajinagar : संभाजीनगरच्या पडेगाव परिसरामध्ये भेसळयुक्त खवा तयार करणारा प्रकार उघडकीस आलाय... या कारखान्यामध्ये पामतेल, वनस्पती तूप, खाण्याचा सोडा, मिल्क क्रीम वापरून भेसळयुक्त खवा तयार करत होते... मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला.. यावेळी पोलिसांनी 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केलाय... तर याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतलंय...
31 Oct 2024, 08:16 वाजता
शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे- रामदास कदम
Ramdas Kadam : रामदास कदम यांनी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय.. एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचं कदम म्हणालेत.. लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री शिंदेंनी मदत करून त्यांना आर्थिक सक्षम केलंय.. त्यामुळे लाडक्या बहिणींनी शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन रामदास कदम यांनी केलंय..
31 Oct 2024, 07:56 वाजता
पुण्यात आतापर्यंत 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
So far 14 crore worth of valuables have been seized in Pune : आचारसंहिता लागू झाल्यापासून पुण्यात आतापर्यंत सुमारे 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.. भरारी पथकांनी कारवाई करत रक्कम जप्त केलीय.... पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 998 तक्रारी प्रशासनाला मिळाल्यात. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, सोने, चांदी यासह अमली पदार्थांचा समावेश आहे.
31 Oct 2024, 07:34 वाजता
तयार फराळाच्या किमतीत 20% वाढ
Faral : तयार फराळाच्या मागणीत ७० टक्क्यांनी वाढ झालीय....सुट्टी नसल्यामुळे बहुतांश महिलांनी घरी फराळ करण्याऐवजी तयार फराळ घेण्यास पसंती दर्शवली आहे. यामुळे यंदा महिला बचत गट आणि गृहउद्योगांकडे फराळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याच वेळी महागाईमुळे फराळांचे दर 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-