Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Sep 2024, 11:13 वाजता

नितीन गडकरींचा राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार

 

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार केलाय. सध्याचे राजकीय नेते बायको आणि पोरांना तिकीट मागतात. लोकांनी अशा घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर हे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, अशी रोखठोक प्रतिक्रिया गडकरींनी दिलीय.

21 Sep 2024, 10:34 वाजता

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सुप्रीम कोर्टात याचिका

 

Delhi : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. मात्र यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्ट का निर्णय देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी पाहा - ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायलयात केली 'ही' मागणी

21 Sep 2024, 09:56 वाजता

पुण्याहून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द

 

Pune Railway : पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्यात.. दौंड ते मनमाड स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आले आहेत.  23 सप्टेंबर पर्यंत पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार असून प्रवाशांची अडचण होणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचे नियोजन आणि वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Sep 2024, 09:29 वाजता

सोलापूर ते पुणे थेट विमानसेवा सुरू होणार

 

Solapur To Pune Flight Service : सोलापूरहुन पुण्याला येण्यासाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरहून पुण्याला अवघ्या 40 ते 45 मिनिटात पोहोचता येणार आहे. फ्लाय 91 या कंपनीमार्फत व्हायबिलिटी गॅप फंडिंग योजनेअंतर्गत ही सेवा सुरू केली जाणार आहे. हॅलो सोलापूर विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर सोलापूर मुंबई सेवा सुरू करण्याच्या आधी सोलापूर पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे.

 

21 Sep 2024, 09:25 वाजता

वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील सूत्रधाराला अटक

 

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील सूत्रधाराला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलंय.  प्रसाद बेल्हेकर असं या आरोपीचं नाव आहे... बेल्हेकरला न्यायालयात हजर केलं असता त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत... आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून यात 2 अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

21 Sep 2024, 08:44 वाजता

सिनेट निवडणुकांवरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

 

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित केल्यावरुन आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही आक्रमक झालाय.. पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलीय..  निवडणुकांना इतके घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील असाही टोला लगावण्यात आलाय.. घाबरट सत्ताधाऱ्यांना इतकंच म्हणावसं वाटतं की, कोंबडं झाकलं तरी सूर्योदय व्हायचा तो होणारच असा सल्लाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिलाय.

21 Sep 2024, 08:41 वाजता

अभाविपचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

 

ABVP On Chief Minister Eknath Shinde : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यावरुन आता राजकारण तापलंय.. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सिनेट निवडणुकीवर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय..राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक पुढे ढकलल्याचा आरोप अभाविपने मुख्यमंत्र्यांवर केलाय.. अभाविपच्या कोकण प्रांताचे प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी हा आरोप केलाय. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आता अभाविप राज्यपालांकडे दाद मागणार आहे.. अभाविपच्या कोकण प्रांताचे प्रदेशमंत्री संकल्प फळदेसाई यांनी हा आरोप केलाय.

21 Sep 2024, 07:40 वाजता

मनोज जरांगेंचा पोलिसांवर आरोप

 

Manoj Jarange On Police : मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवसा आहे.. रात्री त्यांना पुन्हा भोवळ आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलीय... तर रात्री जरांगेंनी शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद साधून पोलिसांकडून मराठा समाजाच्या लोकांना रोखलं जात असल्याचा आरोप केलाय.. लाखो मराठा बांधव आंतरवाली सराटीत भेटण्यासाठी येतायेत मात्र पोलिसांकडून त्यांना अडवलं जात असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. तसेच पोलीस जातीयवादी असून त्यांचं निलंबन करण्याची मागणी जरांगेंनी केलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Sep 2024, 07:34 वाजता

मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतले उपचार

 

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना उपचार घेण्याची विनंती सरकारनं केलीय.. सरकारच्या विनंतीनंतर जरांगेंनी रात्री सलाईन घेऊन उपचार घेतलेय.. आज सरकार निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी जरांगेंना त्यानंतर जरांगेंनी उपचार घेतलेय.. रात्री 2 वाजता जरागेंनी उपचार घेतल्यानं आंतरवाली सराटीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय

बातमीचा व्हिडीओ पाहा -