Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

21 Sep 2024, 15:48 वाजता

महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका

 

Mahayuti : महायुतीतील तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका...शिवसेनेकडून स्टँडिंग उमेदवारांना प्रथम संधी .. शिवसेनेकडून 100 ते 121 जागांची मागणी असल्याची सूत्रांची माहिती...शिवसेना उमेदवार निवडीत भाजपचा हस्तक्षेप नसणार असल्याची सूत्रांची माहिती.. सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा महायुतीचा मानस...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

21 Sep 2024, 15:03 वाजता

मविआची आतापर्यंत 200 विधानसभेच्या जागांवर चर्चा

 

Maha Vikas Aghadi Seat Allotment : जागावाटपाबाबत मुंबईतली मविआची महत्त्वाची बैठक संपली..आजच्या मविआच्या बैठकीत विदर्भातील विधानसभांच्या जागांवर चर्चा झाली....मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली... मविआची आतापर्यंत 200 विधानसभांच्या जागांवर चर्चा झाली..

 

21 Sep 2024, 13:52 वाजता

जागावाटपाबाबत तिन्ही पक्षात समन्वय - संजय राऊत

 

Sanjay Raut On Seat Shairng : जागावाटपाबाबत तिन्ही पक्षात कमालीचा समन्वय आहे. 100,  84, 04 असा कोणताही फॉर्म्युला ठरला नाही, असा खुलासा खासदार राऊतांनी केलाय.. जागावाटपावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही राऊतांनी केलंय.

21 Sep 2024, 12:48 वाजता

शिंदे, फडणवीसांविरोधात उमेदवार देणार - बच्चू कडू

 

Bacchu Kadu : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांविरोधात उमेदवार उभे करून राज्यात 288 जागांवर निवडणुका लढवणार, अशी माहिती तिस-या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडूंनी दिलीय. राज्यात तिस-या आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. 

21 Sep 2024, 12:36 वाजता

मराठा समाजाला आरक्षण द्या - मनोज जरांगे

 

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण द्या.राजकारणाशी आम्हाला देणंघेणं नसल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केलाय.. अंतरवाली सराटीतल आमरण उपोषणाचा जरांगे यांचा आजचा पाचवा दिवस आहे.. यावेळी बोलतांना त्यांनी धनगर आणि मराठ्यांमध्ये काही लोकं भांडणं लावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. दरम्यान रात्री जरांगेंनी उपचार घेतलेत

21 Sep 2024, 11:41 वाजता

अमित ठाकरेंची मुंबई विद्यापीठावर टीका

 

Amit Thackeray : मुंबई सिनेटच्या निवडणुका स्थगित झाल्यानं मनसे नेते अमित ठाकरेंनीही त्यावर टीका केलीय.. मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले असल्याची टीका अमित ठाकरेंनी केलीय.. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, अशी अपेक्षा अमित ठाकरेंनी केलीय.. 

21 Sep 2024, 11:39 वाजता

सिनेट निवडणुका घेण्याची सरकारमध्ये हिंमत नाही - संजय राऊत

 

Sanjay Raut : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानं खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. सिनेटच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची सरकारमध्ये हिंमत नाही, अशा शब्दांत संजय राऊतांचा सरकारवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंवर हल्लाबोल केला.

 

21 Sep 2024, 11:13 वाजता

नितीन गडकरींचा राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार

 

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी राजकारणातील घराणेशाहीवर प्रहार केलाय. सध्याचे राजकीय नेते बायको आणि पोरांना तिकीट मागतात. लोकांनी अशा घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर हे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, अशी रोखठोक प्रतिक्रिया गडकरींनी दिलीय.

21 Sep 2024, 10:34 वाजता

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सुप्रीम कोर्टात याचिका

 

Delhi : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. मात्र यामुळे आता राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्ट का निर्णय देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी पाहा - ऐन विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांकडून अजित पवारांच्या पक्षाची कोंडी? सर्वोच्च न्यायलयात केली 'ही' मागणी

21 Sep 2024, 09:56 वाजता

पुण्याहून सुटणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द

 

Pune Railway : पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्यात.. दौंड ते मनमाड स्थानकांदरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर पुण्याहून धावणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आले आहेत.  23 सप्टेंबर पर्यंत पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्याचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार असून प्रवाशांची अडचण होणार आहे. प्रवाशांनी गाड्यांचे नियोजन आणि वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा -