Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on september 24 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 Sep 2024, 20:52 वाजता

अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्त्रावानं

 

Akshay Shinde Encounter Case :अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने... शवविच्छेदन अहवालात झाला उलगडा...अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद...प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द...7 तास सुरू होत शवविच्छेदन...संपूर्ण प्रक्रियेचं करण्यात आली व्हिडिओग्राफी..5 डॉक्टरच्या पॅनलने केलं शवविच्छेद

24 Sep 2024, 20:13 वाजता

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी

 

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्लीवारी...आज रात्री पटोले दिल्लीला जाणार...दिल्लीत विधानसभा जागावाटपावर चर्चा होणार..मविआ जागावाटपात काँग्रेसचा 110-115 जागांवर दावा 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 Sep 2024, 19:24 वाजता

महायुतीला विदर्भात 45चं टार्गेट

 

Amit Shah : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं कंबर कसलीय.. प्रत्येक बूथवर 10 टक्के मतं वाढवा अशा सूचना,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात भाजप पदाधिका-यांना केल्या. विदर्भातील 45 जागांचं टार्गेट कार्यकर्त्यांना शाहांनी दिलंय.. बूथवर जावून काम करावं लागणार, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या. कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आपापसात वाद करु नये.. अंतर्गत गटबाजी संपवण्याचा महत्त्वाचा कानमंत्र अमित शहांनी दिला.. अमित शाह आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.. तर नागपूरची बैठक प्रत्येक भाजप कार्यकर्त्यासाठी विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया, राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी दिली.

 

24 Sep 2024, 18:10 वाजता

मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव मतदारसंघातून इच्छुक

 

Meenal Khatgaonkar : नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या डॉक्टर मीनल खतगावकरांनी पक्षाकडं विधानसभेची अधिकृत उमेदवारी मागितली. मीनल खतगावकर नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांचा विश्वासूनं त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केलाय. यावेळी, उमेदवारीसाठी असणारी पक्षनिधी म्हणून 10 हजार रुपये अर्जासमवेत भरले आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 Sep 2024, 17:32 वाजता

'आरोपीसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करतील', श्रीकांत शिंदेंची टीका

 

Shrikant Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून खासदार श्रीकांत शिंदेनी विरोधकांवर सडकून टीका केलीये...विरोधक रेलरोको करून बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी करत होते. मात्र आता आरोपीचा मृत्यू झाल्यावर विरोधकांना सुतक का लागतंय? काही दिवसांनी हेच विरोधक त्याची श्रद्धांजली सभाही आयोजित करतील असा घणाघात श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Sep 2024, 17:01 वाजता

अक्षय शिंदे इन्काऊंटर प्रकरण, CIDचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल

 

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे इन्काऊंटर प्रकरणाचा तपास करण्यासाठी CIDचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल..  CIDकडून इन्काउंटर प्रकरणाचा तपास सुरु

24 Sep 2024, 16:31 वाजता

'CMसोबत एन्काऊंटर स्पेशालिस्ट फिरतात', संजय राऊतांचा आरोप

 

Sanjay Raut vs Naresh Mhaske : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसबोत जामिनावर सुटलेले निवृत्त एन्कऊंटर स्पेशालिस्ट फिरतात त्यांची या प्रकरणात भूमिका काय? असा सवाल संजय राऊतांनी केलाय. असे अनेक पोलीस जखमी झालेले बघितलेत, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. तर राऊतांची ही भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका खासदार नरेश म्हस्केंनी केलीय.

24 Sep 2024, 16:01 वाजता

नागपूरच्या शंकरनगरमध्ये मेट्रो बंद पडली

 

Nagpur Metro : नागपूरच्या शंकरनगर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रो बंद पडली..शंकर नगरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर काही तांत्रिक कारणांमुळे मेट्रो बंद पडली...बंद पडलेल्या मेट्रोमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेय.. aqua मार्गावरील मेट्रो सेवा विस्कळीत झाली असून उशिराने धावत आहे

24 Sep 2024, 15:40 वाजता

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास CIDकडे

 

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदे एन्काऊटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे...सीआयडी अधिक्षक, नवी मुंबई हे तपासाचे प्रमुख असणार...सीआयडीचे पथक आजच ठाण्यात दाखल होणार...अक्षय शिंदेबाबत दोन स्तरावर चौकशी हईल- सीआयडी चौकशी व न्यायालयीन चौकशी

24 Sep 2024, 15:13 वाजता

'अक्षय शिंदेला संपवून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न', सुषमा अंधारेंचा आरोप

 

Sushma Andhare : बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला संपवून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला. अक्षय शिंदे गतीमंद होता, असं बदलापूर पोलिसांनीच सांगितलं होतं तर मग त्याने चपळाईनं गोळीबार कसा केला, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. एन्काऊंटर करणारे संजय शिंदे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे, असंही अंधारेंनी म्हटलं आहे.